प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचा विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०६/२०२१
भंडारा फुले शाहू, आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. पहेला येथील ग्रामपंचायतमध्ये कोविड १९ काळात सेवा केलेल्या ग्रामविकास अधिकारी प्रदीप लांजेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुयोग कांबळे, डॉ लिमजे, सरपंच मंगला ठवकर, पोलीस पाटील चंद्रशेखर खराबे, उपसरपंच सुशील बांडेबूचे, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत परिसर व आरोग्य वर्धनी केंद्र, वाकेश्वर येथे केक कापून वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच प्रा. सुरज गोंडाने यांच्या घरकुल परिसरात पत्रकार संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. भंडारा तालुक्यातील झबाडा येथे गोपाळ कुटूंबातील गरीब नागरिकांना सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यांनी किटचे वाटप केले. बेला भंडारा येथील लिबूंनी बुद्धविहार परिसरात रिपब्लिकन पँथरचे भंडारा जिल्हाध्यक्ष माधवराव नारनवरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. तुमसर येथे राहुल डोंगरे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर सोसलं फोरम भंडारा जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली वासू चरडे सर, विजय केवट सर, मुन्ना वर्मा, मनोहर कुंदवाणी समाजसेवक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. नागपूर येथे सुमित राठोड पोलीस अमलदार एस आर पी कॅम्प नागपूर यांनी रामसिंग बैस नागपूर यांना लिंबूचे वृक्ष भेट दिले. परभणी येथे सौ रेखाताई मनेरे मराठवाडा महिला विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वात आदर्श नगर पाथरी येथे मुक्ता डोंगरे, शिला गायकवाड, सुमनबाई साळवे, रेश्मा कोल्हे, यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पंकज वानखेडे, विदर्भ सरचिटणीस शेखर बोरकर, भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ देवानंद नंदागवळी, उपाध्यक्ष प्रा सुरज गोंडाने, जिल्हा सचिव सैनपाल वासनिक, जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीण भोंदे, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे, पवनी तालुका अध्यक्ष प्रशांत शहारे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी राबविलेल्या उपक्रमाबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे .