अधिकारी खिशात मग काय कुणाची बिशाद, पाचोरा तालुक्यातील रेशनिंग वाटपात मोठा घोळ होत असल्याची चर्चा.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०५/२०२१
कोरोनाच्या कालावधीत हाताला काम नसल्यामुळे गोरगरिबांना खाण्यापिण्याचे हाल होऊनये म्हणून पाचोरा तालुक्यासह महाराष्ट्रात दोन महिन्यांसाठीचे धान्य मोफत स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात येत आहे.
परंतु हे धान्य वाटप करतांना रेशन दुकानासमोर माहिती फलक लावणे बंधनकारक असूनही बऱ्यापैकी रेशनिंग दुकानासमोर माहिती फलक लावलेले दिसत नाहीत. कोणत्या महिन्यासाठीचे धान्य वाटप आहे. धान्य वाटप करतांना प्रतिव्यक्ती किंवा प्रत्येक रेशनकार्डवर गहू, तांदूळ किती कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नसल्याने सर्वसामान्य जनतेला पूर्णपणे धान्य वाटप केले जाते का हा प्रश्न अनुत्तरित आहे.
तसेच महत्त्वाचे म्हणजे बरेचसे रेशन दुकानदार पे पॉस मशिन वापरतात रितसर त्याचा वापरही करतात मात्र त्यात कागदी रोल नसतो याबाबत विचारणा केल्यास पे पॉश मशिन मध्ये लागणारा कागदी रोल उपलब्ध होत नसल्याने आम्ही पावती देऊ शकत नाही. असे सांगितले जाते. पे पॉश मशिनव्दारे जर पावती मिळत नसेल तर हस्तलिखित पावती देणे बंधनकारक असल्यावरही रेशनिंगचे धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांना पावती दिली जात नसल्याने रेशनिंगचे वाटपात मोठा घोळ होत असल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे.
गरजवंताला अक्कल थोडी.
हाताला काम नसल्याने हतबल झालेला सर्वसामान्य नागरिक दोन घास खाऊन पोट भरण्यासाठी प्रयत्नशील असतांनाच शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून त्यांच्या हक्काचे असलेल्या धान्याचा घोटाळा सुरु असल्याचे नाव न सांगण्याच्या अटींवर गावागावातील गरिब गरजू सांगतात.
रेशनिंग चालकांची दहशत
एखादा लाभार्थ्यांने रेशनिंग दुकानात जाऊन सविस्तर माहिती विचारण्याचा प्रयत्न केल्यास त्याला उडवाउडवीची उत्तरे देऊन हाकलून लावले जाते. तसेच आपण तक्रार केल्यावर आपल्याला मिळणारे धान्य बंद होईल या भितीपोटी बरेचसे लाभार्थी जे मिळतय त्याच्यावर समाधान मानुन चुप बसत असल्याने रेशनिंगचा काळाबाजार वाढला आहे. जणूकाही यांना कुणाचीही भिती नसल्याचे दिसून येते.
तरी रेशन वाटप करतांना प्रत्येक रेशनिंगच्या दुकानातून रितसर पावती देण्यात यावी व ज्या रेशनिंगच्या दुकानातून धान्य वाटपाबाबत पावती दिली जात नाही. अश्या दुकानांची चौकशी होऊन पुरवठा विभागामार्फत कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
(रेशनिंगच्या वाटपाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी असूनही पुरवठा विभाग लक्षद देत नसल्याने या बाबतीतही जनतेतून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.)