गौतमभाऊ सोनवणे यांची पँथर्स आर्मीच्या पाचोरा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०७/२०२१
पाचोरा येथील गौतमभाऊ सोनवणे (पी.बी,सी.चॅनल)चे पत्रकार यांची पँथर्स आर्मी मराठवाडा अध्यक्ष अनिल भाई खरे यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली
त्यांनी असच अन्याय विरोधात पेटून उठाव गोरगरीब वंचित जनतेला आपल्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा ही अपेक्षा गौतम जी यांचं पँथर्स आर्मी च्या वतीने अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा
ही नियुक्ती किशोर भाई खिल्लारे राष्ट्रीय अध्यक्ष पँथर्स आर्मी महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार व पँथर्स आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर खिल्लारे यांच्या हस्ते सर्वानुमते करण्यात आली,
गोरगरीब वंचित शोषित नागरिकांना त्यांच्या शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच अन्याय, अत्याचाराविरोधात लढून गावोगावी गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे ढाल बनून ते उभे राहून मी काम करील असे मत गौतम सोनवणे यांनी व्यक्त केले.
या वेळी त्यांना मराठवाडा अध्यक्ष अनिल खरे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन बागुल जिल्हा उपाध्यक्ष अशोक कामिटे अक्षय फुलकर रजनीश सभादिंदे संदीप गायकवाड योगेश पुरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.