पाचोरा ते जामनेर (पि.जे.) रेल्वे बचाव कृती समिती मार्फत (पी.जे.) गाडी सुरू करण्यासाठी पाचोरा येथे स्वाक्षरी मोहिमेला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~९/०१/२०२२
पाचोरा ते जामनेर (पी.जे.) बचाव कृती समितीतर्फे (पी.जे.) रेल्वे पुर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी रेल्वे प्रशासनाला एक लाख सह्यांचे निवेदन देण्यासाठी आज पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेला पाचोरा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी कृती समितीचे खलील दादा देशमुख, कायदेतज्ञ अविनाश भालेराव, पप्पू राजपूत, कायदेतज्ञ अण्णासाहेब भोईटे, भरत खंडेलवाल, संजय जडे, प्रा. गणेश पाटील, बशीर काका बागवान, प्रताप पाटील, प्रा. सुनील शिंदे, रणजीत पाटील, अनिल आबा येवले, जिल्हापरिषद गटनेते रावसाहेब पाटील, बँकेचे संचालक अविनाश कुडे, मुख्याध्यापक संघाचे गोकुळ पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश पटवारी, वकील संघाचे कायदेतज्ज्ञ अभय पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती नितीन तावडे, जमील सौदागर एकता आटो रिक्षा संघटनेचे एकनाथ सदांशिव बाबा पवार देवीदास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड गणेश पाटील, गुरु लाल पवार, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.