जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मिळणार वाढीव मदत. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१०/२०२१
शासनाने अतिवृष्टीत नुकसान झालेल्या १४ जिल्ह्यातील शेतकर्याना २ हजार ८०० कोटी ची मदत काल जाहिर केली होती. मात्र जळगाव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरचे नुकसान होऊनही या मदतीच्या जळगाव जिल्ह्याला वगळण्यात आले होते. ही बाब आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आपली भुमिका मांडली. ही गंभीर बाब असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटल यांनी लगेचच आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आक्रमकपणे हा विषय मांडला. त्यावर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत मान्य केल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले.
पाचोर भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात जास्तीची मदत देण्याबाबत आमदार कीशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली होती. त्यानंतर एसडीआरएफच्या दरापेक्षा अधिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. काल शासनाने मदत जाहीर केली मात्र त्यात जळगाव जिल्ह्याला वगळण्यात आले होते. ही बाब सकाळी आमदार किशोर आप्पा पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ मुंबईत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार किशोर पाटील यांचे स्विय सहाय्यक राजेश पाटील,पाचोरा नगरीचे नगराध्यक्ष संजय गोहिल ही होते.
अतिवृष्टी ही सर्वदूर झाली असल्यावरही जळगाव जिल्हा वगळणे म्हणजे हा शेतकऱ्यांवर एकप्रकारे अन्याय असल्याची भूमिका मांडली त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय आक्रमकपणे मांडला.
त्यानंतर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करून नव्याने या संदर्भातला निर्णय जाहीर करण्यात येईल असं सांगितले. त्यामुळे या मदतीच्या यादीत जळगाव जिल्ह्याचा ही समावेश होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले . त्यानंतर पालक मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले.