अंबे वडगाव खुर्द येथे वैकुंठधामचे भूमीपूजन संपन्न.
दीलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/१२/२०२०
अंबे वडगाव खुर्द व अंबे वडगाव बुद्रुक ही दोघ तांडा वस्तीची गाव असून येथे बंजारा बांधव रहातात. या गावासाठी गावाचे जवळच स्मशानभू आहे. परंतु येथे वैकुंठधाम बांधलेले नसल्याने पावसाळ्यात अंत्यविधी करणे म्हणजे खुपच अवघड होते.
ही समस्या अंबे वडगाव खुर्द व बुद्रुक ग्रामस्थांनी जिल्हापरिषद सदस्य श्री. मधुकर काटे यांना सांगितली लगेचच मधूकर काटे यांनी वैकुंठधाम बांधणेसाठी जनसुविधा फंडातून तिनलाख रुपये मंजूर करुन दिले.
या बांधकामाची वर्क ऑर्डर निघाली असून आज हेमराज राठोड.व सरपंच वसंत पवार. यांच्या हस्ते कामाच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी धनंजय मोहन राठोड. उपसरपंच, चरणसिंग महारु राठोड, मेहेराम दल्लु राठोड, रामलाल भिकारी राठोड, उत्तम शंकर राठोड, उदल जेसा राठोड, विनोद भिमसिंग राठोड, शिवलाल पदम चव्हाण, रंगलाल मनोहर जाधव, सोनु सिंग काळू राठोड, बसराज झामु पवार, साईदास हेमराज राठोड, हिरामण अमरसिंग चव्हाण, दिलीप मोरसिंग चव्हाण ईत्यादी ग्रामस्थ हजर होते.