राहुल गांधी जन्मदिन सप्ताह निमित्ताने महीला कॉग्रेसने केले वृक्षारोपण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०६/२०२१
येथील महीला कॉग्रेस च्या वतीने कॉलनी भागात वृक्षारोपण करण्यात आले*.
देशाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा कॉग्रेस संकल्प सप्ताह साजरा करीत आहे. या सप्ताहात विविध आंदोलने, निदर्शने सह समाजाला उपयुक्त अशी कामे करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून महीला कॉग्रेसने सदगुरु नगर परीसरातील खुल्या भुखंडात वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेतला. यावेळी महीला तालुका अध्यक्षा अॅड. मनिषा पवार यांच्या सह जिल्हाउपाध्यक्षा संगिता नेवे, शीला सुर्यवंशी स्थानिक रहीवाशी नलिनी देसले, प्रमिला पाटील व उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करुन लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमाला रविंद्र नेवे, बापुराव देसले, भास्कर पाटील, प्रभाकर पाटील, विनोद चौधरी,पंकज पाटील, श्री. कुमावत, यश सुर्यवंशी, ऋषीकेश पाटील, गुणवंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.