सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›पाचोरा येथील विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सहभाग.सलग तिस मिनीटे स्केटिंग करून केला विश्वविक्रमात सहभाग.

पाचोरा येथील विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सहभाग.सलग तिस मिनीटे स्केटिंग करून केला विश्वविक्रमात सहभाग.

By Satyajeet News
June 30, 2021
921
0
Share:
Post Views: 265
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०६/२०२१

जन्माला आल्यानंतर सर्वचजण चाकोरीबध्द आयुष्य जगात असतात.माञ या चाकोरितुन बाहेर पडून स्वतःला जगापुढे सिध्द करणारे मोचकेच असतात.असाच काहीसा प्रयोग शारिरिक शिक्षण शिकविणारे सुनिल मोरे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनमार्फत सोबत करुन दाखवला. वर्ल्डवाईड इव्हेंट्स प्लॅनर्स प्रेझेंट तर्फे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड २०२१ मध्ये सहभाग घेउन सलग तिस मिनिटे स्केटिंग करण्याचे करून शहरातिल १० विद्यार्थ्यांची या आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त कसे की पाचोरा शहरातील गणराज स्पोर्ट्स स्केटिंग अकॅडमीच्या माध्यमातुन खेडाळुंना त्यांच्या खेळाच्या साहित्यांसोबतच त्यांना लागणारी आवशक ते साहीत्य तालुका पातळीवर उपलब्ध करून देणारे सुनिल मोरे यांनी शहरातिल विविध शाळांमध्ये पीटीचे शिक्षक म्हणुनही काम केले आहे. विद्यार्थ्यांना शारिरिक शिक्षण देण्यासोबतच तायकाॅंदो,कराटे,योगा,स्केटिंग व नृत्य अशा विविध कलागुणांना तंञशुध्द प्रशिक्षण देउन त्यात नैपुण्यता आणण्याचे कार्य गेली १५ वर्षापासुन करित आहेत.

हे चाकोरीतिल आयुष्य जगतांना त्यांच्या कार्याची जिद्द विद्यार्थ्यांना राष्टिय पातळीपर्यंत नेणारी ठरली असली तरी पाचोरा शहरातील विद्यार्थ्यांच्या या गुणांची दखल जागतिक पातळिवर घेण्यात यावी ही तळमळ गेल्या अनेक वर्षांपासुन त्यांच्या मनात होती. करोना काळातही शासकिय नियमांचे पालन करून शहरातिल भडगाव रोडवरिल शक्तिधाम येथे विद्यार्थ्यांना शारिरिक शिक्षणासह तायकाॅंदो,कराटे,योगा, स्केटिंग व नृत्याचे धडे देण्याचे कार्य त्यांनी न थांबता अविरत सुरूच ठेवले.

अशात २५ ते २७ जून ला वर्ल्डवाईड इव्हेंट्स प्लॅनर्स प्रेझेंट तर्फे जागतिक पातळिवरहोत असलेल्या स्केटिंगच्या उपक्रमाची माहीती त्यांना प्राप्त झाली.या घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड २०२१ ला आपल्या विद्यार्थ्यांना सहभागी करून पाचोऱ्याचे नाव जागतिक पातळिवर पोहचविण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरण्याची नामी संधी त्यांना मिळाली.त्यांनी भडगाव रोडवरिल शक्ती धाम येथे आपल्याच प्रशिक्षण केंद्रातिल दहा मुलांची निवड करून त्यांच्याकडुन तिस मिनिटे स्केटिंगचा सराव करून घेतला.

अखेर २८ जुन हा दिवस उजाडला आणी गणराज स्पोर्ट्स स्केटिंग अकॅडमीच्या १० विद्यार्थ्यांनी सलग ३० मिनिटे स्केटिंग करून आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पाचोरा शहराचे नाव नोंदविले आहे. यात विक्रमात सहभागी झालेले आयुष मोरे,आराध्य पाटील,अथर्व मराठे,नील सोनवणे, रियांश पाटील, विवेक गायकवाड, अक्षय चव्हाण, श्रेयस शिंदे, अतिक साटोटे, ईशान मोरे, यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

या यशाबद्दल बोलतांना सुनिल मोरे म्हणाले की, सर्व पालक वर्ग यांनी आणि सतत विद्यार्थ्यांनसह मला प्रोत्साहन व प्रेरणा देणारे रमेश मोर यांनी दिलेले पाठबळ दाखविलेला विश्वास आणी मुलांनी केलेले अथक परिश्रम यातुन हे यश मिळाले आहे.हे सर्व यश माझ्या अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांचे असुन मी निमित्तमाञ असल्याची प्रतिक्रिया दिली.पाचोऱ्याचे नाव जगभर नेणाऱ्या या चिमुकल्याचे पाचोरा शहरासह पंचक्रोशित अभिनंदन होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

राहुल गांधी जन्मदिन सप्ताह निमित्ताने महीला कॉग्रेसने ...

Next Article

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    स्वतः चा मुलगा आजारी असतांनाही पोलीसाने माणुसकी दाखवून वाचवले १२ दिवसाच्या बाळाचे प्राण.

    September 14, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अंगारकी चतुर्थीला वरखेडी बसस्थानक परिसरात उघड्यावर मांस विक्री.

    January 10, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अवैध धंद्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यावर ताणली बंदूक, सातगाव डोंगरी परिसरात खळबळ.

    November 20, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    Whales male signs i dry deep won’t to wherein open multiply

    July 16, 2015
    By SURAJ DEOHATE
  • Uncategorized

    काळखेडा सारगाव ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम, दारू दुकानाची जागा स्पर्धा परीक्षा केंद्राला.प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे लवकरच जाहीर सत्कार.

    July 25, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    रशियन टेक्निकलॉजी द्वारे कंपाउंड फॅक्चर झालेल्या रुग्णावर सुधन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया.

    February 25, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    कोल्हे धरणातून विद्युत चोरी सह पाणी चोरी, विद्युत वितरण कंपनी व पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.

  • ब्रेकिंग न्यूज

    तंबाखू , गुटखा खाताय तर पाच हजार रुपये तयार ठेवा, व्यसन करणाऱ्या पोलीसांवर शिस्तभंगाची कारवाई होणार.

  • Uncategorized

    खरकटे वेचवया गेले ते कावळे, रणीझुंजाया राहीले ते मावळे.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज