वरखेडी येथील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समितीच्या अध्यक्षपदी हेमशंकर तिवारी.

वरखेडी येथे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समितीच्या अध्यक्षपदी लोकमत वृत्तपत्राचे पत्रकार श्री.हेमशंकर पृथ्वीराज तिवारी यांची २ ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी वरखेडी गावच्या सरपंच सौ. अलकाताई धनराज विसपुते होत्या.व सदर सभेस उपसरपंच श्री.धनराज राजु पाटील व संपुर्ण ग्रा.पं.सदस्य व ग्रामविस्तार अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.निवडीनंतर हेमशंकर तिवारी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
हेमशंकर तिवारी हे पत्रकारितेचा वसा जपतांना पत्रकारितेच्या माध्यमातून वरखेडी व परिसरातील सर्व घडामोडींना कुठलाही स्वार्थ साधण्याचा मनसुबा मनी न बाळगता रोखठोकपणे लिखाण करुन समाजातील सर्व घटकांना न्याय देत सचित्र प्रसिध्दी देवून समाजसेवा करीत असतात..गावाचे नाव प्रकाशझोतात ठेवत असतात व छोट्यामोठ्या घटकांना या माध्यमातुन न्याय मिळवुन देत असतात या निवडीबद्दल हेमशंकर तिवारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.