सत्यजित न्यूजचे भाकीत खरे ठरले, पाचोरा पोलिस स्टेशनला राहुल सोमनाथ खताळ साहेबांची नियुक्ती.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०२/२०२३

पाचोरा पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक मा. श्री. नजन दादा पाटील यांची बढती झाल्यामुळे पाचोरा येथून जळगाव येथे बदलून गेले होते. तेव्हापासून पाचोरा पोलिस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून मा. श्री. प्रताबराव इंगळे हे कामकाज पहात होते. मध्यंतरीच्या काळात पाचोरा पोलिस स्टेशनला नवीन पोलिस निरीक्षक कोण येणार म्हणून अनेक नावांची चर्चा ऐकायला मीळत होती.

परंतु धरणगाव पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष सज्जनांचे मित्र तर दुर्जनांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे मा. श्री. राहुल सोमनाथ खताळ यांची पाचोरा पोलिस स्टेशनला नियुक्ती होण्याची शक्यता असे भाकीत सत्यजित न्यूज कडून वर्तविण्यात आले होते.

आता नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार मा. श्री. राहुल सोमनाथ खताळ साहेबांची धरणगाव येथून पाचोरा येथे बदली झाली असून ते लवकरच पाचोरा पोलिस स्टेशनला हजर होणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या