बेलापूरचे व्यापारी गौतम हिरणच्या खुन्यांना अटक करण्यासाठी भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे बुधवारी राज्यव्यापी आंदोलन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०३/२०२१
बेलापूरचे व्यापारी गौतम हिरणच्या खुन्यांना अटक करण्यासाठी भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे बुधवारी राज्यव्यापी आंदोलन
बेलापूर जिल्हा अहमदनगर येथील प्रतिथयश व्यापारी गौतम हिरण यांचे १ मार्च रोजी अपहरण होऊन निघृण हत्या करण्यात आली . त्यांचा मृतदेह 6 दिवसांनी सापडला . पोलीसांच्या निष्क्रियतेमुळेच हा बळी गेल्याची महाराष्ट्रातील व्यापारी वर्ग व समाजाची भावना असून या अपहरणाचे व खुनाचे सूत्रधार व आरोपी यांना पकडून योग्य शासन होण्यासाठी भाजपा अल्पसंख्यक मोर्चा तर्फे बुधवारी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्यक मोर्चाचे अध्यक्ष एजाज देशमुख व भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे जैन प्रमुख संदीप भंडारी यांनी दिली.
अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व सकल जैन समाज महाराष्ट्र यांनीही या राज्यव्यापी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे . व्यापारी गौतम हिरण यांचे १ मार्च रोजी अपहरण झाल्यापासून भाजपा अल्पसंख्यक मोर्चाने राज्य सरकारकडे त्यांचा तपास करण्याची आग्रही मागणी केली होती.
भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन याविषयी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती . जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता . विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत याप्रश्नी आवाज उठवला होता . दुर्दैवाने या प्रकरणाचा पोलीस खात्याकडून वेळीच योग्य तपास न झाल्याने ७ मार्च रोजी गौतम हिरण यांचा मृतदेह बेलापूरपासून अवघ्या १० किलोमीटरवर सापडला . परंतु गेले आठवडाभरापासून तपास करत असलेल्या पोलिस यंत्रणेला तो मृतदेह कसा आढळला नाही ? याबाबत व्यापारी वर्गात , समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे . या अपहरकर्त्या खुन्यांना ताबडतोब शोधून त्यांना कठोर शासन व्हावे यासाठी भाजपा अल्पसंख्यक मोर्चा व जैन समाजाची राष्ट्रीय शिखर संस्था अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघाच्यावतीने बुधवार दिनांक १० मार्च रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येत असल्याचे ललित गांधी व संदीप भंडारी यांनी जाहीर केले आहे.
यावेळी संपूर्ण राज्यात व्यापारी वर्ग व जैन समाजातर्फे निदर्शने करण्यात येणार असून स्थानिक प्रशासन , जिल्हाधिकारी , जिल्हापोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात येणार आहे . या आंदोलनात अधिकाधिक व्यापारी बंधुंनी व जैन समाजाने सामील व्हावे तसेच दिवसभर काळ्या फिती लावुनच कामकाज करावे , असे आवाहन करण्यात आले असून आंदोलनाच्या वेळी को इसंदर्भातील सकीय आचारसंहितेचे कोटकोरपणे पालन करावे , असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे .
बेलापुर – श्रीरामपुर ( जि . अहमदनगर ) येथील व्यापारी श्री . गौतम हिरण यांचे १ मार्च २०२१ रोजी त्यांचे दुकानाजवळुन अपहरण झाले . ७ मार्च रोजी श्री . गौतम हिरण यांचा मृतदेह सापडला तसेच श्री . मनसुख हिरेण यांचा देखील मुंब्यांच्या खाडीत मृतदेह सापडला या दोन्ही घटनांनी जैन समाजाला धक्काच बसला . मितभाषी व्यापाऱ्यांची निघृण हत्या ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे . वेळीच व योग्य तपास न झाल्यानेच गुन्हेगार ही हत्या करू शकले अन्यथा त्यांचा जीव वाचवता आला असता . या घटनेमुळे जैन समाजात तीव्र आक्रोश असुन अत्यंत संतप्त भावना आहेत . सदर अपहरणकर्ते व खुन्यांचा तात्काळ तपास लागावा व दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी आमची आग्रही मागणी आहे . या खुनाचे नेमके कारण कळावे व त्वरीत तपास व्हावा तसेच श्री . गौतम हिरण यांच्या खुनाच्या तपासासाठी लवकरात लवकर एस.आय.टी. गठीत करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी .