रस्ता सुरक्षिततेसाठी जय संघर्ष वाहन चालक,मालक सामाजिक संस्था तर्फे पाचोरा पोलिस स्टेशनला निवेदन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०६/२०२१
आजच्या परिस्थितीत जळगाव जिल्ह्यासह पाचोरा भडगाव जामनेर तालुक्याचे वर्दळीच्या रस्त्यावर रात्री-बेरात्री गाड्यांवर दगडफेक करण्यात गाड्या अडवून लूटमार करणे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा घटना घडत आहेत याबाबत पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष देऊन या होणाऱ्या घटना थांबवावा अश्या मागणीचे निवेदन जय संघर्ष वाहन चालक,मालक सामाजिक संस्थेतर्फे पाचोरा पोलिस स्टेशनला देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त की जळगाव जिल्ह्यात बेरोजगार सुशिक्षित तरुण शासनाचा रितसर परवाना घेऊन नियमांचे पालन करत प्रवासी वाहतूक करत असतो. हे प्रवासी वाहतूक करत असतांना खेडेगावात काही वाईट प्रसंग घडतात यात अपघात हृदयविकाराचा झटका, सर्पदंश, अपघात होणे, एखाद्या कुटुंबावर शोककळा पडणे अशा घटना अचानकपणे घडतात व या घटनांची वेळ काळ निश्चित नसते या कारणास्तव घडलेल्या घटना ज्या ठिकाणी मदत करणे किंवा त्यांच्यासाठी मदतीस धावून जाणे अत्यावश्यक रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचवणे यासाठी आम्ही भाडेतत्त्वावर का होईना धावपळ करत असतो. परंतु अशा परिस्थितीत रात्री-बेरात्री आम्हाला प्रवासी सेवा किंवा रुग्णसेवा करतांना काही ठिकाणी रस्त्यावर अडवून मारठोक केली जाते. व रस्ता लुटी सारखा प्रकार केला जातो. अशा प्रकारामुळे आमच्या व प्रवाशांच्या जीवितास धोका असून आपण या गैरप्रकार आकडे जातीने लक्ष देऊन या रस्ता लूट करणाऱ्या टोळक्यांचा पर्दाफाश करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अश्या मागणीचे निवेदन जय संघर्ष वाहन चालक मालक सामिल संस्थेमार्फत आज देण्यात आले. याप्रसंगी पाचोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. गणेशजी चौबे व पोलिस उपनिरीक्षक मा.श्री. राहूल मोरे यांनी निवेदन स्विकारुन जय संघर्ष वाहन चालक मालक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.
यावेळी जय संघर्ष वाहन चालक, मालक संस्थेचे पाचोरा तालुका अध्यक्ष श्री.भुषण लोखंडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. प्रविण वाघ,काळी पिवळी अध्यक्ष श्री. नाना साहेब शिंदे,अवजड विभाग,सागर चव्हाण, ह्यांच्या सह्या निवेदन पत्रावर आहेत,तरी निवेदनासाठी खान्देश सहकार्य अध्यक्ष श्री. योगेश पवार,जळगाव जिल्हा सह सचिव प्रफुल्ल गायकवाड, अध्यक्ष काळी पिवळी गोपाल पाटील,पाचोरा तालुका सचिव श्री. गोटू पाटील,व सदस्य भैय्या साहेब पाटील,पाचोरा ता संघटनक,सेख रौफ,पप्पु साठे, महेश मराठे,सुधाकर बडगुजर, संजय पाटील,भावसाहेब पाटील, गणेश अंबेकर,गजू पोतदार, संदिप धनगर,मुबारक पिंजारी, योगेश पाटील,सोहेल शाह,जिवन पाटील,पप्पु बडगुजर, सर्व सदस्य पदाधिकारी हजर होते.,