१२ जून रविवार रोजी जळगाव येथे हुंकार वेदनेचा काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०६/२०२२
‘मृत्यू घराचा पहारा’ या पुस्तकाला वाचकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर खाकी वर्दीतील साहित्यिक / कवी ‘मृत्यूकार’ विनोद अहिरे लिखित हुंकार वेदनेचा या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा सत्यशोधकी साहित्य परिषद,जळगाव द्वारा आयोजित करण्यात आला असून हा प्रकाशन सोहळा दिनांक १२ जून २०२२ रविवार रोजी अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे सायंकाळी ठिक ०६ वाजता मा.श्री. गुलाबरावजी पाटील पाणीपुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
खाकी वर्दीतील साहित्यिक व कवी पो.ना. विनोद पितांबर अहिरे यांनी या अगोदरही ‘मृत्यू चर्चा पहारा’ हे पुस्तक लिहिले आहे. आता त्यांनीच लिहिलेला ‘हुंकार वेदनेचा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा.श्री. संजयजी आवटे (साहित्यिक, विचारवंत, वक्ते, पत्रकार तथा संपादक दै. लोकमत, पुणे), मा.श्री. अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी जळगाव), मा.श्री. चंद्रकांत गवळी (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात होणार आहे.
या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी मा. जयश्रीताई महाजन, महापौर, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव, मा.श्री. कुलभूषण पाटील, उपमहापौर, जळगाव, शहर महानगरपालिका, जळगाव, मा.श्री. डॉ. मिलिंद बागूल, संमेलनाध्यक्ष, पहिले फुले आंबेडकरी विचार शिक्षक संमेलन- २०२१ मा. रवी टाले, संपादक, लोकमत, जळगाव आवृत्ती, मा.श्री. मुकुंद सपकाळे, अध्यक्ष, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा मा.श्री. रियाज अली सैय्यद, ठाणे मा. मल्हारी शिवरकर, सपोनि, नांदेड, मा.श्री. युवराज माळी, संचालक, अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव मा. दिलीप सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते, जळगाव हे उपस्थित राहणार आहेत. तरी साहित्यिक, लेखक, कवी, वाचकांनी तसेच स्नही जनांनी या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सत्यशोधकी राहित्य परिषद, जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.