पावसाने हुलकावणी दिल्याने, एका शेतकरी पुत्राने मांडलेल्या व्यथा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०६/२०२१
आज २२ जून चा दिवस उजाडला तरीही समाधानकारक पाऊस नाही. दिवसेंदिवस निसर्गाच्या वातावरणात होणारे बदल, दिवसेंदिवस कमी होत चाललेले पर्जन्यमान या सगळ्या संकटांचा सामना करत शेतकरी जिद्दीने आपल्या शेतात राबत असतो.
यावर्षीही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी कंबर कसली शेतात बी बियाणे टाकले परंतु अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यातूनच अंबे वडगाव येथील उताऱ्यावरचा किंवा बांधावरचा नव्हे तर थेट मातीत राबणाऱ्या संतोष पाटील शेतकरी चळवळीतील सक्रिय कार्यकरता शेतकऱ्याने आपले दोन शब्द कवितेतून मांडले आहेत.
मी पेरलं शिवार अन बाई
आभाळ पांगल
पांगल अभाळ अन पाणी
डोळ्यात दाटलं
—————————-‐–
वाण दाळी साळीचं मडक्या गाडग्यातलं
चिल्यापिल्यांच्या ओठाच
मी मातीत पुरलं
मी पेरलं शिवार….
———————————
सर्वदूर धोंडी धोंडी
मी वेशीला पुजलं
ढगाळल्या राती बाई
चांदण सजलं
——————————
मातीच्या गर्बातलं बीज इवलसं
नाही अजून अंकुरलं
हिरवं सपान डोळ्यातलं
डोळ्यात थिजलं
मी पेरलं शिवार अन बाई
आभाळ पांगल..
——————————-
संतोष पाटील
7666447112