पाचोरा पोलीसांची धडकेबाज कारवाई. अनेक गुन्हे उघडकीस.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०६/२०२१
मागील बऱ्याच दिवसा पासून पाचोरा शहरात मोटरसाइकील चोरीचे बरेच गुन्हे दाखल असतांना मा.पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटिल यांच्या मार्गदर्शन खाली पोना/राहुल सोनवणे,पोना/विश्वास देशमुख, पोना/दीपक सुरवाडे, पोना/विनोद बेलदार असे तपास करीत असतांना त्यांना मिळालेल्या माहिती नुसार आरोपी नामे सलमान गुल्लू पिंजारी यास ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने यापूर्वी माझे मित्र फिरोज पिंजारी शाहरुख शेख शेखलाल व शकूर टकरी फिरोज पिंजारी अशांनी संगनमताने पाचोरा शहरात विविध ठिकाणी मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपी याचा पोलिसांनी शोध घेतला व आरोपी मजकूर यांना अटक करून तीन दिवसाची पोलिस कस्टडी घेऊन आरोपी मजकूर यांना कडून पाचोरा शहरातील चार मोटारसायकली व औरंगाबाद येथे चोरून आणलेली एक मोटर सायकल जप्त करण्यात आले असून असे पाचोरा पोलिस स्टेशनचे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले असून सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मा.श्री. प्रवीणजी मुंडे साहेब, एडिशनल एसपी मा.श्री. सचिन गोरे साहेब, डी.वाय.एस.पी.मा.श्री. भरतजी काकडे साहेब तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. श्री. किसनराव नजन पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील कर्मचारी श्री. राहुल सोनवणे,श्री. मल्हार देशमुख, श्री.दीपक सुरवाडे,श्री. विनोद बेलदार,श्री. राहुल बेहरे,श्री. किरण पाटील,श्री. होमगार्ड कौतिक पाटील,श्री. मिलिंद माळी यांनी केली आहे.
(पोलिसांनी अजूनही शोध घेतल्यास पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा गावातून अश्या चोरीच्या गाड्या आढळून येतील यात शंका नाही.)