दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१२/२०२२

(संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा.)

गोरगरिबांच्या घरची चुल पेटावी व कुणावरही उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून केंद्र सरकार दरमहा कित्येक कोटी रुपयांची झळ सोसून स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून शासकीय दराने तसेच मोफत धान्य उपलब्ध करुन देत आहे. परंतु हे गोरगरिबांच्या नावाने त्यांच्या वाट्यावर येणारे धान्य वाटप करतांना संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नसल्याने या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळा बाजारात होऊन हे गोरगरिबांचे धान्य मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात जात असल्याचे जनमानसातील चर्चेतून समोर येत आहे. यामुळे (गरीबांचे पोट अधिक, आधिक खोल चालले असून धान्याचा काळाबाजार करणारे रेशन दुकानदार ‌व हप्ते घेऊन या भ्रष्टाचाराला मुक संमती देणारे पुरवठा विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ढेऱ्या फुगत चालल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी प्रसारमाध्यमांन समोर व्यक्त केले आहे.

याबाबत वारंवार अर्जफाटे व तक्रार करुनही काहीएक कारवाई होत नसल्याने गोरगरिबांच्या वाट्याला येणारे धान्य त्यांना मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय विलासभाऊ हिवाळे व सेना प्रमुख भाई दिनकर ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती साधनाताई काळे यांनी विडा उचलला असून शासनाकडून गोरगरिबांच्या वाट्याला येणारे धान्य त्यांना मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.