उद्यापासून वरखेडी येथील गुरांचा बाजार भरणार पशुधन पालक व व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. प्रशासक मंडळाच्या प्रयत्नांना यश.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०६/२०२१
महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला वरखेडी येथील गुरांचा बाजार उद्या दिनांक १० जून गुरवारपासून भरणार असून पशुधन पालक व व्यापाऱ्यांनी याची नोंद घेऊन आपली गुरेढोरे व खरेदी-विक्रीसाठी या बाजारात आणावे असे आवाहन पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक यांनी कळविले आहे.
तसेच वरखेड येथील गुरांचा बाजार बंद असल्याने गुरूंचे व्यापारी तसेच पशुधन पालक यांचे देवाण-घेवाण थांबल्याने बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील व अनिल महाजन तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मंडळ यांनी प्रयत्न करून पाचोरा व भडगाव तालुक्यातील आठवडे बाजार सुरू केल्याने पशुधन पालक व व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारण बाजार बंद असल्याने गरजवंतांना आपली किंमती जनावरे मातीमोल भावात विकावे लागत होते. विशेष करून शेळी पालकांचे विशेष हाल झाले होते. तरी उद्यापासून या भरणार या बाजारामुळे पशुधनपालक व्यापारी यांच्यात आनंदमय वातावरण झाले.
तरी उद्या बाजार भरणार असून या बाजारात सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळत तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधून बाजारात सामील व्हावे व शासनाला मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.