निवडणूक कार्यकाळात गैरहजर रहाणाऱ्या शाखा अभियंत्याविरोधात गून्हा दाखल

कदीर पटेल.(सिल्लोड तालुका प्रतिनिधी)
निवडणूक बैठकांना गैरहजर राहणे भवले तहसीलदारांची. कारवाई ग्रामपंचायत निवडणुकी साठी. नियुक्ती करून ही प्रशिक्षण तसेच बैठकांना गैरहजर राहणार्या तसेच कारणे दाखवा नोटीस बजावून ही खूलासा न. करण्याना एक. शाखा अभियंताविरोधात सोमवा सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शाखा अभियंता. के.एस.गाडेकर ( सार्वजनीक बांधकाम उपविभाग सिल्लोड) असे गून्हा दाखल करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. तालुक्यातील मूदत संपलेल्या ८३ ग्रामपंचायतीची निवडणुक १५ जानेवारीला होत आहे. या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता आर. पी. निकाळजे (जिल्हा परिषद बांधकाम पंचायत समिती सिल्लोड) व शाखा अभियंता के. एस .गाडेकर ( सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिल्लोड) यांची निवडणुक विषयक ३ ग्रामपंचायतीसाठी निवडणुक निर्णय प्रथकाच्या कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आलीले होती. यामुळे बुधवारपासून ( दिनांक २३|१२|२०२०. या रोजी नामनिर्देशन उमेदवारी अर्ज प्रत्र स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणे अनिवार्य होते परंतु हे दोन्ही अभियंता गैरहजर राहीले यामुळे तहसीलदारांनी निवडणुकीसारख्या महत्वाच्या राष्टीय कामकाजत जाणीवपूर्वक दूर्लक्ष करून टाळाटाळ केल्याने ( दिनांक २४|१२|२०२० रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती २४ तासांत कारणे दाखवा नोटीसचा समाधानकारक लेखी खूलासा करावा नसता लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५९ चे कलम ३४नूसार फौजदारी स्वरूपाची कार्यवाई करण्यात येईल असे कारण दाखवा नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. शाखा अभियंता के. एस .गाडेकर यांनी लेखी खूलासा न. केल्याने सोमवारी. दिनांक २८|१२|२०२० रोजी मंडळ अधिकारी विनोद धोकटे यांनी तक्रार दाखल केली त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील शाखा अभियंत्याविरोधात शहर सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.