मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याच दोघही महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताची बातमी सत्यजीत न्यूजला सकाळी येताच संपूर्ण घटनेचा तपशील विचारण्यासाठी सतत फोन येत होते.
सामनेर येथील जवळपास १५० स्त्री-पुरूष दररोज सकाळी सामनेर ते लासगाव दरम्यान मॉर्निग वॉकसाठी जात असतात.
म्हणून दिनांक ४ फेब्रुवारीच्या सकाळी ५ ते ५/३० वाजेच्या दरम्यान दरम्यान
मनिषा साहेबराव पाटील (वय~५०)
अनिता शहादु पाटील (वय~४८)
या दोघेही महिला मॉर्निंग वॉक करून घराकडे परतत असतांनाच अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली या धडक इतक्या जोरात होती की यात एक महिला दुर फेकली गेली तद दुसऱ्या महिलेला वाहनचालकाने पन्नास मिटर पर्यंत फरफटत नेले असे स्थानिक लोकांनी सांगितले.
ही घटना माहित पडताच सामनेर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत वाहन चालक घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला.
अपघातग्रस्त महिलांना पाचोरा येथील नगरपालिका दवाखान्यात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे ,पोलिस हवालदार रामदास चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.