सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›कोरोना योद्ध्यांच्या वेदनेचं देशातील पहिले पुस्तक लिहिणारे, कोरोना योद्धा पोलीस विनोद अहिरे यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून कौतुक, गृहमंत्र्यांना स्वलिखित ‘मृत्यू घराचा पहारा’ पुस्तकाची प्रत दिली भेट.

कोरोना योद्ध्यांच्या वेदनेचं देशातील पहिले पुस्तक लिहिणारे, कोरोना योद्धा पोलीस विनोद अहिरे यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून कौतुक, गृहमंत्र्यांना स्वलिखित ‘मृत्यू घराचा पहारा’ पुस्तकाची प्रत दिली भेट.

By Satyajeet News
November 2, 2020
196
0
Share:
Post Views: 40
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन. ( पाचोरा )
जळगाव जिल्हा पोलिस दलामध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे, गेल्या सहा महिन्यापासून जळगाव कोरोना कक्ष येथे कार्यरत आहेत. त्यांना एप्रिल महिन्यामध्ये आलेल्या कोरोना कक्षातील २१ दिवसांच्या अनुभवांचे,कोरोना योद्धांच्या वेदनेचे, मे महिन्यांमध्येच देशातील पहिले पुस्तक ‘मृत्यू घराचा पहारा’ या नावाने लिहून काढले दी.१/११/२०२० रोजी अमळनेर येथील पोलीस वसाहत कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस नाईक विनोद अहिरे यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील, पोलीस महानिरीक्षक प्रकाश दिगावकर, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अमदार चिमण आबा यांच्यासह आदी मान्यवर उपस्थितीत गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या ‘मृत्यू घराचा पहारा’ पुस्तकाची प्रत भेट दिली.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्हा पोलिस दलात पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले, पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे गेल्या सहा महिन्यापासून जळगाव कोरोना कक्षाची ड्युटी करीत आहेत. दि.२१/०४/२०२० रोजी अहिरे यांची प्रथमच कोरोना कक्षात ड्युटी लावण्यात आली होती. त्यावेळेस कोरोणाची जनमानसात प्रचंड दहशत होती त्यात पोलीस दलही अपवाद नव्हते. त्यामुळे श्री अहिरे देखील कुटुंबीयांच्या काळजीने प्रचंड भयभीत झाले होते ते आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की माझ्या अठरा वर्षाच्या नोकरी मध्ये आतापर्यंत ड्युटी करण्याची इतकी भीती कधीच वाटली नव्हती याअगोदर अनेक जोखमीच्या ठिकाणी दंगलीमध्ये जिवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडले आणि झालो जरी जखमी किंवा जीवही गेला तर ते आपल्या पुरती मर्यादित होते पण कोरोना कक्षाची ड्युटी करताना हा आपल्यालाच धोका नसून आपल्या कुटुंबियांना देखील धोका निर्माण होऊ शकतो पर्यायाने मृत्यूदेखील येऊ शकतो या कल्पनेने मी अक्षरशः भेदरून गेलो होतो तरी देखील माझ्यासाठी देश महत्त्वाचा होता कर्तव्य महत्त्वाचे होते परंतु ज्या कोरोणा कक्षात ड्युटी करताना ज्या माझ्या भावना होत्या मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दबद्ध करून मी २२/०४/२०२० रोजी फेसबुक वर फेसबुक पोस्ट केली त्या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी मला फोन करून सांगितले की तुम्ही तुम्हाला आलेल्या अनुभवांचे पुस्तक पुस्तका लिहा जेणेकरून समाजाला माणसांना पोलिसांच्या ड्युटी करतानाच्या वेदना देखील कळतील यामुळे याला प्रचंड प्रतिसाद मिळाला या प्रचंड प्रतिसादामुळे त्यांनी एकवीस दिवसातील कर्तव्याचे आलेले अनुभव त्यांच्या वेदना दिनांक १६/०४/२०२० रोजी मृत्यू घराचा पहारा या शीर्षकाखाली पूर्ण पुस्तक लिहून काढले सदर पुस्तकाला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त श्री विश्वास नागरे पाटील यांनी प्रस्तावना दिलेली आहे.पोलीस अधीक्षक जळगाव, व निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी पुस्तकाला लेखी स्वरूपात शुभेच्छा दिलेल्या आहेत.
तसेच विनोद अहिरे यांना पोलीस खात्यामध्ये ज्यांनी भरती केले असे प्रवीण साळुंके साहेब यांना यांच्यासह या कोरोणा महामारी मध्ये ज्यांनी आपल्या जीवाचे दान दिले आहे. तसेच कोरोना महामारी विरुद्ध लढणार्‍या योद्ध्यांना अर्पण केलेले आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर यांनी त्या पुस्तकाला अर्थसहाय्य केलेले आहे सदर पुस्तकामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर देखील मुख्यमंत्री हे जनतेचे पालक या शीर्षकाखाली लेख लिहिण्यात आलेला आहे तसेच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपले संपूर्ण एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत जमा करणारे ते एकमेव कर्मचारी आहेत.
त्यांनी प्रकाशनापूर्वीच आपली पहिली प्रत छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केलेली आहे. ते म्हणाले की,माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विशेष प्रभाव असल्याने माझे विचारही तसेच आहेत. त्यांच्या विचारांमुळेच मी हे पुस्तक लिहू शकलो.
माझं वैयक्तिक मत असं आहे की, प्रत्येकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दडलेले आहेत. तुमच्यावर कितीही अन्याय झाला. कितीही संकट आली तरी तुम्ही या महापुरुषांना त्यांच्या विचारांना तुमच्या आत मध्ये जिवंत ठेवा मग तुमच्यामध्ये ते एका योंध्याच्या रूपाने असू शकतात. किंवा एका विद्रोहाच्या रुपाने असू शकतात. खेळाडूचे रूपांमध्ये असू शकतात.कवीच्या रुपयांमध्ये असू शकतात. वक्त्याच्या रूपामध्ये असू शकतात किंवा साहित्यिकाच्या रूपामध्ये असू शकतात त्यांना नेहमी जागते ठेवा. त्यांच्या विचारांची ज्योत कधीच विझू देऊ नका,कदाचित ते माझ्यामध्ये साहित्यिकाच्या रूपाने असतील म्हणूनच मी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कोरोना कक्षामध्ये मृत्यूची भीती असून सुद्धा मी हे पुस्तक लिहू शकलो याचं श्रेय फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते‌
वेदना ह्या साहित्याचा केंद्रबिंदू आहेत. साहित्य हे वेदनेभोवतीच फिरत असते. मला फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची लाभ लावलेली थोडीफार साहित्य दृष्टी मला नेहमी प्रेरणा देत असते…. म्हणूनच हे पुस्तक मी लिहू शकलो. या पुस्तकाच्या मुळाशी माझी वेदनाच आहे. फक्त मी त्या वेदनेचा बाजार न मांडता त्याऐवजी मी लिखाणाने ती वेदना शमवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केलेला आहे. असेही ते म्हणाले

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

Next Article

सामाजिकपाचोरा विठ्ठल महाजन यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    सत्यजित न्यूजची दखल घेत पाचोरा नगरपरिषदे कडून जाहीर खुलासा.

    March 29, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जागतिक महिला दिनानिमित्त योग व आरोग्य शिबिर संपन्न.

    March 15, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगावशुभेच्छा जाहिरात

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    December 9, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कुऱ्हाड खुर्द येथे ब्रेक द चेन लॉकडाऊचा फज्जा- ग्रामपंचायतीकडून डोळेझाक.

    May 7, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जामनेर, पाचोरा रस्त्यावर अंबे वडगाव येथे रस्त्यावर खड्डा. अपघाताची मालिका सुरु.

    October 19, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती चाळीसगाव च्या वतीने दिव्यांग दिन सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

    December 4, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पिंपळगाव हरेश्वर येथील गुरु गोविंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन शालिग्राम मालकर यांचा राजीनामा यांचा राजीनामा.

  • पाचोरा तालुका.

    पतसंस्थेमुळे ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत झाली, आमदार किशोर आप्पा पाटील.

  • ब्रेकिंग न्यूज

    वरखेडी, नगरदेवळा येथील गुरांचे बाजार बंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांचे आदेश.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज