किशोर रायसाकडा यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता, दोषींवर कारवाई करण्याची पोलीस अधिक्षक जळगाव यांच्याकडे मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०५/२०२१
पाचोरा येथील रहिवासी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष मा.श्री. किशोर रामदास रायसाकडा यांच्यावर काही विध्नसंतोषी गुंडांकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने त्यांनी नजरकैदे चे संपादक मा.श्री.प्रविणजी सोनवणे यांना सोबत घेत जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा.श्री. प्रविणजी मुंडे यांना निवेदन देऊन माझ्यावर होणाऱ्या पूर्वनियोजित हल्ल्याची चौकशी करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा येथील मा.श्री. किशोर रामदास रायसाकडा हे मागील पंधरा वर्षांपासून मानससेवी पत्रकारिता करतात तसेच ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष असून दैनिक नजरकैद या वृत्तपत्रातून पत्रकारिता करतात.
सत्य परिस्थितीत पत्रकारिता करतांना घडलेल्या व घडणाऱ्या घटनांचे तसेच समाजात घडणाऱ्या चांगल्या, वाईट प्रसंगी सत्य परिस्थितीवर वृत्तांकन करतांना इच्छा नसतांनाही कळत,नकळत बातमीत संबधित व्यक्तींच्या अनेकदा भावना दुखावल्या जातात.यात प्रसंगानुरूप पत्रकारिता करतांना पत्रकाराचे कुणाशीही वैयक्तिक भांडण किंवा मतभेदाचा काही एक संबध येत नाही.
असे असतांनाच अनेकांचे गैरसमज होतात व पत्रकारांविषयी मनात व्देष भावना निर्माण होते. अश्याच प्रकारातून मा.श्री. किशोर रायसाकडा यांच्यावर प्राणघातक हल्ला होणार असल्याची माहिती किशोर रायसाकडा यांच्या एका जवळच्या जिवलग मित्राला महित झाल्यावर जिव्हाळ्यापोटी त्या मित्राने ही माहिती किशोर रायसाकडा त्यांना दिली.
याची दखल घेत खबरदारीचा उपाय म्हणून किशोर रायसाकडा यांनी दैनिक नजरकैदचे संपादक मा.श्री. प्रविणजी सोनवणे यांना सोबत घेऊन सदर प्रकरणी पूर्व नियोजित हल्ला करणाऱ्या अज्ञाताचा शोध घेऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.