शासनाने तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करावे -आमदार गिरीश महाजन कापूस खरेदीचा शुभारंभ ५८२५ रु ने खरेदी
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=१७/११/२०२०
शासनाने तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार गिरीश महाजन यांनी पहूर येथील तिरूपती जिनींग प्रेसींग येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र उद्घाटनाच्या प्रसंगी केली.
शेतकऱ्याचा मकाचे उत्पन्न यावर्षी खूप चांगलं आलेल आहे मात्र बाहेर खाजगी व्यापारी मका खरेदीत त्यांना योग्य मोबदला देत नसल्याने शासनाने हमी भावाप्रमाणे मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केले मागील वर्षी सी.सी.आय.कापूस केंद्र सुरू झाले मात्र बऱ्याच वेळा बंद सुरू झाले असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला मात्र यावर्षी सि.सि.आय. कापूस केंद्र सुरळीत सुरु ठेवण्यात यावे असेही आमदार गिरीश महाजन यांनी म्हनाले.
आज खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी कापसाला ५८२५/०० रुपये भाव देऊन शुभारंभ करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख माजी सभापती बाबुराव घोगडे राजधर पांढरे अमित देशमुख जि.प.सदस्य सुरेश बोरसे उपसभापती पंचायत समिती जामनेर दौलत घोलप किसान मोर्चाचे संतोष चिंचोले राजु जाधव राजमल भागवत समाधान पाटील प्रदिप लोढा भास्कर पाटील बाजर समितीचे प्रसाद पाटील प्रशासक डि.व्ही.पाटील सी.सी.आय. चे प्रमोद पाटील तिरुपती जिनिंग प्रेसिंग चे संचालक ज्ञानेश्वर पाटील किशोर पाटील रामेश्वर पाटील कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजधर पांढरे यांनी केला आणि सूत्रसंचालन चेतन रोकडे यांनी केला आभार भारत पाटील यांनी व्यक्त केले यावेळी कोविड योध्दा मनोज जंजाळ यांचा सत्कार करण्यात आला.