सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • बोगस शिक्षक भरती प्रकरणी धापेवाडा येथील भाजपच्या माजी तालुका अध्यक्षाला अटक.

  • गुटखा प्रकरणी आरोपीच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत, पाचोरा पोलीसांच्या हाती मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता.

  • पोलीस कारवाई होताच दोघे गुटखा किंगचा झाला समेट , एकाने पोलीस स्टेशनला जाऊन वाहनचालकाची घेतली भेट.

  • पोलीसांनी गुटखा पकडला मात्र गुटखा किंगवर ठोस कारवाई कधी ?

  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पालकमंत्र्यांच्या मदतीने भारावले तृतीयपंथीय,जीवनावश्यक किटचे वाटप,ना.पाटलांनी पालकत्व घेतल्याची भावना.

पालकमंत्र्यांच्या मदतीने भारावले तृतीयपंथीय,जीवनावश्यक किटचे वाटप,ना.पाटलांनी पालकत्व घेतल्याची भावना.

By Satyajeet News
May 11, 2021
477
0
Share:
Post Views: 37
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०५/२०२१

जळगाव येथे दिनांक १० मे रोजी कोरोनामुळे तृतीयपंथियांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याची दखल घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने आज या समुदायातील सदस्यांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. या मदतीने अतिशय उपेक्षित अशा या समुदायातील मंडळी अक्षरश: भारावली. ना. पाटील यांनी आमचे पालकत्व घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

याबाबत वृत्त असे की, कोरोनामुळे सध्या कडक निर्बंध सुरू असून यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आलेली आहे. यातच समाजाच्या मदतीवरच उपजिवीका अवलंबून असणार्‍या तृतीयपंथी समाजावर तर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्यासाठी सध्याचे दिवस हे अतिशय खडतर असून आशेचा कोणताही किरण दिसून येत नाहीय. अशा विपरीत वातावरणात हभप गजानन महाराज वरसाडेकर यांनी या समुदायाची व्यथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कानावर टाकली. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी तातडीने या समुदायातील सदस्यांसाठी जीवनावश्यक किटची व्यवस्था केली. आज अजिंठा विश्रामगृहात तृतीयपंथी समुदायातील सदस्यांना या किटचे वाटप करण्यात आले.

याबाबत मनोगत व्यक्त करतांना पालकमंत्री म्हणाले की, तृतीयपंथी समाज हा आधीच उपेक्षित असून सध्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर आपत्ती आल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. ही मदत फार काही मोठी नसली तरी त्यांच्यासाठी काही दिवसांपर्यंत ती पुरणार आहे. आपण याला मदत मानत नसून ते आपल्या घरातीलच सदस्य असल्याने हे घरच्या मंडळीला केलेले सहकार्य आहे.

दरम्यान, तृतीयपंथियांच्या मदतीने या समुदायासाठी काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, पालकमंत्र्यांनी केलेली मदत ही आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी या माध्यमातून आमचे पालकत्व स्वीकारले असल्याचे भावपूर्ण उदगार त्यांनी याप्रसंगी काढले.

या छोटेखानी कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, नगरसेवक मनोज चौधरी, डीपीसी सदस्य श्याम कोगटा, सा.बा.चे सहाय्यक अभियंता सुभाष राऊत यांची उपस्थिती होती.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

शेतकऱ्यांचा विद्यूतपुरवठा त्वरित जोडून द्यावा, अन्यथा तीव्र ...

Next Article

केंद्रसरकारकडून दोन महिन्याचे व राज्यसरकारकडून एक महिन्याचे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    सुनजगाव येथील शेतकऱ्यास डॉक्टर सागरदादा गरुड यांनी दिला मदतीचा हात.

    November 27, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कोरोना लसीकरण हे प्रत्येकासाठी मिशन व्हावे.(डॉ.राहुल निकम)

    May 1, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील सार्वे(पिंप्री) गाव बनले समस्यांचे माहेरघर

    November 29, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सावखेडा येथील गोळी लागून निधन झालेल्या जवानाचे निवासस्थानी बच्चूभाऊ कडू व सहकाऱ्यांची सात्वनपर भेट.

    November 16, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कुरंगी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात निलगाय ठार, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण.

    January 22, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अमळनेर येथे पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.

    July 22, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • शैक्षणिक

    होळ येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिंनी एन. एस. एस. इ. परिक्षेत तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण.

  • शैक्षणिक

    शाळेच्या संचालक मंडळाची मनमानी, पालकाच्या डोळ्यात पाणी. शाळेची फी भरली नसल्याने विद्यार्थिनी वार्षिक परीक्षेपासून वंचित.

  • आपलं जळगाव

    पाचोरा शहरात वॅक्सिन उपलब्ध मात्र यंत्रणा अपूर्ण, कॉंग्रेस मैदानात.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज