लोहारा विद्यालयात मास्क चे वाटप माणुसकी ग्रुप व सुलक्ष्मी सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२१
डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय येथे दिनांक ०२ फेब्रुवारी २०२१ रोजी माणुसकी समूहाच्या वतीने विद्यालयात मास्क वाटप करण्यात आले यावेळी माणुसकी समुहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर ,कवी मंगलदास मोरे यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस चौधरी सर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.यु.डी.शेळके मॅडम, डी.एम.गरुड.उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.एस.चौधरी सर यांनी प्रास्ताविकातून माणुसकी समूहा च्या सदस्यांचे स्वागत केले व माणुसकी समूहाने समाजासाठी केलेल्या उपक्रमांविषयी व मदती विषयी त्यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना ओळख करून दिली व मास्क दैनंदिन जीवनात महत्त्व समजून सांगितले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांना तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी त्याच्या कार्याविषयीची माहिती दिली तसेच कवी मंगलदास मोरे यांचा आज जन्मदिवस पण होता. ते शिग्र कवी असल्याने त्यांनी कोव्हिड विषयी त्रिसूत्री कविता सादर केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षिका यांनी विद्यार्थ्यांना मास्क चे वाटप केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही एम शिरपूरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री पी एम सुर्वे सर यांनी मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.