मेणगाव येथे मोकाट कुत्र्यांकडून वासरीचा फडश्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२०
शेंदुर्णी येथून जवळच असलेल्या मेणगाव ता.जामनेर येथील प्रगतिशील शेतकरी विलास भास्कर चौधरी यांचे गावालगत पत्राचे शेड आहे. या शेड मध्ये दि.20 च्या मध्यरात्री गावातील पाळीव व काही मोकाट कुत्र्यांनी जवळपास 5 ते 6 फुटाचे कंपाऊंड वरून जाऊन या कोवळ्या जवळपास 15 दिवसाची असणाऱ्या वासरीचा फडश्या पडला आहे.
ही बाब सदर शेतकरी दि.21 रोजी सकाळी दूध काढण्यासाठी गेले असता निदर्शनास आली.
या कुत्र्यांनी या घटनेच्या अगोदर गावातील बऱ्याच वासरांना ठार केले आहे. मात्र संबंधित कोणीही या कुत्र्यांचा बंदोबस्त करू शकले नाही.भविष्यात हीच गावातील मोकाट कुत्र्ये लहान मुलांना पण धोकादायक ठरू शकतात. अशी भीती पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या घटनेअगोदर मेणगाव येथील शेतकरी नलिन भगवान गुजर यांची तीन वर्षांनी वगार (म्हेस) व एक वर्षाची वासरी,रतन उखा कोल्हे या शेतकऱ्यांची एक वर्षाची वगार,जितेंद्र तुकाराम महाजन यांच्या गोरा,(बैल), गणेश अमृत गुजर यांचा गोर्हा. याच कुत्र्यांनी या जनावरांना ठार केलंय, तसेच विनोद भास्कर चौधरी यांच्या पण म्हशींवर या पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला केला होता, या वेळी म्हशीच्या कानाला मोठी दुखापत झाली आहे.वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.
सध्या ग्रामपंचायत निवडणूक असल्याने या गंभीर प्रश्नांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीत..तरी शेंदुरणी पोलीस स्टेशनचे संबंधितांनी लक्ष देऊन या मोकाट कुत्र्यांचा व त्यातील काही पाळीव कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. तसेच पाळीव कुत्र्या मालकांना तश्या सूचना कराव्यात. या अगोदर बऱ्याच वेळा अश्या घटना घडल्या आहेत. भविष्यात गावात अशी मोठी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? पुन्हा अशी घटना घडूच नये म्हणून संबंधितांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.