सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›एटीएम मशिन चोरून नेण्याचा प्रयत्न फसला, पाचोर्‍यातील घटनेमुळे परिसरात खळबळ

एटीएम मशिन चोरून नेण्याचा प्रयत्न फसला, पाचोर्‍यातील घटनेमुळे परिसरात खळबळ

By Satyajeet News
May 5, 2021
1884
0
Share:
Post Views: 79
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०५/२०२१

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील स्टेट बँकेचे एटीएम मशिन चोरून नेण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून याची चाहूल लागल्याने चोरट्यांचा हेतू यशस्वी झाला नाही. मात्र पोलिसांनी पीक अप व्हॅनमधून पळ काढणार्‍या चोरट्यांचा पाठलाग केला असता चोर व्हॅन सोडून पसार झाले. या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील भडगाव रोड वरील स्टेट बँकेचे एटीएम मंगळवारी रात्री १.३० वाजेच्या सुमारास एटीएम च्या समोरील काच चोरट्यांनी फोडल्याचा आवाज ऐकून आशीर्वाद प्लाझाचे शिपाई अल्पेश बापू तावडे, याने मालक मुकुंद बिल्दीकर यांना आरडा ओरडा करून सांगितले. मुकुंद बिल्दीकर यांनी तातडीने खाली येऊनव लागलीच पोलीस हवालदार राहुल बेहेरे यांना त्याबाबत कळवले. त्या आधारे बेहरे यांनी पोलीस हवालदार किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला. दोघे स्टेट बँके जवळ पोहोचले तोपर्यंत चोरटे पसार झाले.

दरम्यान, दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांनी भडगाव रोड, जारगाव चौफुली, जळगाव रोड, जामनेर रोड अक्षरशः पिंजून काढला. यात त्यांना भडगाव रोड भागात पीक अप व्हॅन भरधाव जात असल्याचा संशय आल्याने राहुल बेहरे यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. ते पिकअप व्हॅन चालकाच्या लक्षात आल्याने त्याने पांडव नगरीच्या रस्त्याने गाडी वळवली व गाडी मागे असलेल्या राहुल बेहरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गाडी अंगावर आणली व पुन्हा पलायन करण्याचा प्रयत्न केला. अशाही परिस्थितीत न घाबरता राहुल बेहरे यांनी गाडीचा पाठलाग केल्याने चोरट्यांनी सदरची गाडी ही भट्टगाव रस्त्याला लावली पुढे रस्ता नसल्याने गाडी पिकप व्हॅन सोडून चोरटे पसार झाले. या गाडीत जाड दोरखंड, लोखंडी अवजारे आढळून आली.

ए.टी.एम. मशिन गाडीत टाकून नेण्याचा त्यांचा मानस असावा असा संशय आहे. भट्टगांव शिवारात गाडीतील साहित्याच्या आधारे श्‍वान पथकास पाचारण करून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. मुकुंद बिल्दीकर यांची सजगता व राहुल बेहरे, किरण पाटील यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

नंबर प्लेट झाकली

एसबीआयचे ए. टी. एम. मशिन पळवून नेण्यासाठी पीकअप वाहनावर एम. एच. ०६ ऐ. जी. १०४१ हा नंबर असून हा क्रमांक कागद चिकटवून झाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आनले आहे. घटनेचा प्रकरणी मुकुंद बिल्दीकर यांचे शिपाई अल्पेश बापू तावडे याने पाचोरा पोलीस ठाण्यात तीन संशयित व अनोळखी सुमारे २५ ते ३० वयाच्या इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील हे करीत आहेत. संशयित आरोपींच्या अटकेसाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, विकास पाटील यांनी पाहणी केली. यानंतर श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

वस्तूंची केली मोडतोड

एसबीआयचे एटीएम मशिन पळवून नेण्यासाठी तीन संशयित वाहन घेऊन आले होते. त्यांचा एटीएम मधून पैशाची चोरी न करणा थेट मशिनच पळून नेण्याचा प्रयत्न होता. मशिन चोरण्यासाठी चोरट्यांनी मशिनच्या वायरी तोडून बाहेरील दरवाचा व सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तोडफोड आणि काचांची तोडफोड करण्यात सुमारे १ हजार ५०० रुपयांचे नुकसान केले. मात्र शिपायच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. शहरातील अनेक वेळा अनेक ए. टी. एम. मशिन फोडून चोर्‍या झाल्य आहेत. असे असतांना या ठिकाणी बँकेने वाचमन ठेवण्यची तसदी घेतलेली नाही. या बाबत नागरीकांकडून आचर्य व्यक्त केले जात आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

मृत्यूच्या तांडवातही पत्रकार बेहाल.(पत्रकार महेंद्र खोंडे.)

Next Article

डॉ. प्रशांत पाटील. यांनी केल्या मार्गदर्शक सूचना.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    भोकरी येथील हाणामारी प्रकरणातील तीन फरार आरोपींना अटक.

    August 19, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पहूर पोलिसांची वॉश आऊट मोहीम सुरु, अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले.

    March 29, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    घरगुती गॅस वाहनात भरतांना शिरसोली येथील आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हा शाखेच्या ताब्यात.

    September 30, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाचोरा पोलीस ॲक्शन मोडवर, अवैध दारु विक्रेत्याला पकडले बिल्धी फाट्यावर.

    January 18, 2025
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    माणूसकीला काळीमा फासणारी घटना, निपाणे गावात स्मशानभूमीतही जातीयवाद.

    September 14, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    केबल वायर चोरी प्रकरणातील तीन आरोपी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांच्या ताब्यात, न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कस्टडी

    February 24, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • निधन वार्ता

    मुरलीधर चव्हाण यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन.

  • पाचोरा तालुका.

    गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त आई आणि मी उपक्रम उत्साहात साजरा.

  • पाचोरा तालुका.

    उपोषणाचा तिसरा दिवस

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज