भूमिगत गटारीचा पाईप फुटल्याने, गल्लीत दुर्गंधी व चिखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०४/२०२१
अंबे वडगाव येथील ग्रामपंचायतीने गावातील काही भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत गटारी बनवल्या असून या भूमिगत गटारींमुळे गावातील सांडपाणी व्यवस्थित वाहून जात होते.
परंतु काही ग्रामस्थांनी या गटारींच्या पाईपलाईन मध्ये माती, कचरा, प्लॅस्टिक कागद जाऊनये म्हणून काळजी न घेतल्याने अनिल पाटील, चिंधिबाई पाटील, दिलीप जैन यांच्या घराजवळील भुमिगत गटारीचे पाईपलाईन मध्ये केरकचरा व घाण अडकल्याने सांडपाणी वाहून न जाता चेंबरमधुन बाहेर निघून गल्लीत चिखल व पाण्याचै डबके तयार झाले असल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी येत आहे. तसेच डासांचा त्रास वाढला असून या चिखलात डुकरे येऊन बसतात आरडाओरड करत असल्याने या गल्लीतील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्येवर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना वारंवार सांगूनही मागील पंचवीस दिवसापासून या भुमिगत गटारींची दुरुस्ती केली जात नसल्याने दुर्गंधी, डास व डुकरांच्या त्रासामुळे रहिवाशांची मानसिक स्थिती व आरोग्य धोक्यात आले आहे.