कुऱ्हाड खुर्द येथे जिल्हापरिषद सदस्य श्री. दिपकभाऊ राजपूत यांच्यातर्फे मोफत कोविड लसीकरण.
चेतन पाटील.(कुऱ्हाड)
दिनांक~२७/०४/२०२१
कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावात कोरोनाची लागण झाली होती. दररोज रुग्णसंख्या वाढतच होती. याची दखल घेत कुऱ्हाड, लोहारा गटाचे जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. दिपकभाऊ राजपूत यांनी आरोग्यविभागाला सोबत घेऊन या दोघही गावात जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करुन घेत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना त्यांच्या सोई प्रमाणे काहींना दवाखान्यात तर काहींना होम कॉरंटाईन करून योग्य उपचार देऊन कोरोनामुक्त केले. आता या दोघही गावात नविन लागण नसून यापुढे कोणालाही कोरोनाची लागण होऊनये म्हणून आजरोजी कोविड लसीकरण शिबिर घेण्यात आले.
दिपकभाऊ राजपूत यांच्या तर्फे आजच्या या पहिल्या टप्प्यात कुऱ्हाड खुर्द गावातील ४० लोकांना मोफत कोविड लसीकरण करण्यात आले. या लसीकरण मोहीमेत लोहारा आरोग्य केंद्राचे डॉक्टर मा.श्री. देवेंद्र पाटील, डॉ. पि.डी.पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच कुऱ्हाड गावच्या सरपंच सौ. संगीताबाई भगत, उपसरपंच अशोक देशमुख, ग्रामपंचायत सदस्य कौतिक शिवराम बोरसे, अरुणभाऊ पाटील, तानाजी पाटील, सुधाकर महाजन, शिपाई अशोक बोरसे , बाबुलाल चौधरी, कैलास भगत,आदी मान्यवर उपस्थित होते.