कुऱ्हाड बुद्रुक येथे घराघरातून कोरोना (टेस्टिंग) चाचणी व्हावी (ग्रामस्थांची मागणी)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०४/२०२१
( सरपंच यांचा भ्रमणध्वनी कव्हरेज क्षेत्राचे बाहेर असल्याने ग्रामस्थ हैराण )
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक या गावात आजपर्यंत पाच कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असून अजून बरेचसे कोरोनाबाधीत व काही संशयित कोरोनाबाधीत असून काही वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत तर काही होम कॉरंटाईन झाले असून घरीच उपचार घेत असल्याचे खात्रीलायक समजते.
म्हणून कुऱ्हाड बुद्रुक हे गाव पाचोरा तालुक्यातील हॉटस्पॉट ठरत आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशी प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली असून स्थानिक ग्रामपंचायत, पोलिस पाटील व आरोग्यविभागाने कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कडक पावले उचलावीत अशी मागणी होत असून घराघरातून कोरोनाची टेस्टिंग (चाचणी) करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे।
तसेच कुऱ्हाड बुद्रुक गाव व तांड्यातील परिस्थिती पहाता ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक हे कोणत्याही ठोस उपाययोजना राबवत नसल्याने व होमकॉरंटाईन केलेले संशयित कोरोना रुग्ण घरात रहात नसून गावभर फिरतांना दिसून येतात तरी त्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.