कै. बाबुराव गुरदाल पवार विद्यालयायाच्या उपाध्यक्षा कै. सौ. निर्मलाकौर यांच्या जयंतीनिमित्त पहिलीच्या विद्यार्थ्यांना गणेश वाटप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील व जय अंबिका शिक्षण प्रसारक मंडळ बदलापूर जिल्हा ठाणे संचलित कै. बाबुराव गुरदाल पवार (नाईक) माध्यमिक विद्यालयाच्या उपाध्यक्षा स्व. सौ. निर्मलाकौर अरुणसिंग बाबासिंग ईसलावत यांच्या ५५ व्या जयंतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अरुणसिंग बाबुसिंग ईस्लावत, जय अंबिका शिक्षण मंडळाचे श्री. प्रदीपसिंग अरुण पवार तसेच संचालक (प्राथमिक विद्यालय) शालेय समितीचे अध्यक्ष श्री. करण अरुण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक १२ जूलै २०२२ मंगळवार रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
याप्रसंगी श्री. महादू तुळशीराम राठोड, डॉ. पंकज बापूजी जाधव, शामसिंग पदम पवार, मेहाराम दल्लू राठोड, जालम छगन राठोड, रामेश्वर पवार, गोविंद हरदास चव्हाण,हप्रेमराज गरमक राठोड, दुधाकर संतोष चव्हाण, रामेश्वर पुनमचंद पवार, रविंद्र चव्हाण (कोकडी) हे मान्यवर उपस्थित होते.