नगरदेवळा येथील चि. हिमांशू महाजन हा एम. टी. एस. परिक्षेत राज्यातून तृतीय तर पाचोरा केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०३/२०२३

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवासी व चिंचखेडा बुद्रुक जिल्हापरिषद शाळेचे शिक्षक मा. श्री. दिलीप महाजन यांचा मुलगा चिरंजीव हिमांशू हा नुकत्याच घेण्यात आलेल्या एम. टी. एस. परिक्षेत राज्यभरातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांमधून २०० पैकी १८४ गुण मिळवून ९२% टक्क्यांनी महाराष्ट्र राज्यातून तृतीय तर पाचोरा केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. या यशाबद्दल नगरदेवळा गावासह भडगाव व पाचोरा तालुक्यातील सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत नसून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. या यशामागे पाचोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचारी वृंदाचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य कामी आल्याचे चिरंजीव हिमांशू महाजन याने सांगितले.