अवैधधंदे करणारे व पाठीराख्यांची खेळी , आंदोलनकर्ते व प्रसारमाध्यमांना बदनाम करण्याचा कट
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=२२/११/२०२०
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावपरिसरातील अवैधधंदे बंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला व संबधीतांना वारंवार निवेदने देऊनही अवैधधंदे करणारांच्या विरोधात कोणतीही कडक व ठोस कारवाई होऊन अवैधधंदे कायमस्वरूपी बंद होत नव्हते. तर दुसरीकडे गावपरिसरात व्यसनाधीनता वाढत चालली होती. यामुळे बरीचशी कुटुंब बर्बाद झाली असून काही बर्बादिच्या मार्गावर आहेत. तसेच गावपरिसरात दररोज भांडणतंटे होणे.नित्याचेच झाले आहे. सगळीकडे अशांतता पसरली आहे.म्हणून गावकऱ्यांनी अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग निवडला होता.
याची दखल घेत पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे धाडसत्र सुरु झाल्यावर अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले व पायाखालची वाळू सरकली म्हणून अवैधधंदे करणारे व यांचे पाठीराखे यांची शनिवारी रात्री एका ठीकाणी बैठक होऊन आंदोलन कर्ते प्रसारमाध्यमांना बातम्या देणारे प्रतिनिधी यांच्यावर कटकारस्थान करून खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी चर्चा झाली असल्याचे खात्रीलायक समजते
महत्त्वाचे म्हणजे पोलीस प्रशासन व जनतेतील महत्त्वाचा दुवा समजला जाणारा एक जबाबदार घटक सुध्दा यात सामील असल्याची एक भ्रमणध्वनीवर बोलतांनाची अॅडीयो सत्यजित न्यूजच्या हाती लागली असून या बाबत लवकरच वरीष्ठ पातळीवर तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
आता अवैधधंदे करणारे व त्यांचे काही हितचिंतक यांनी अजून असाच कट शिजवून तयारी केली असल्याचे चर्चिले जात आहे.