आमदार मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांनी ऋषीपांथा येथे मुंडण करून तिघाडी सरकारचे घातले तेरावे, व केले श्राध्द.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०४/२०२१
आमदार मंगेश चव्हाण यांनी मागील आठवड्यात एक विद्यूत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना खुर्चीत बांधून गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन रितसर कारवाई व नुकताच जामीन झाल्यानंतर जामीनावर घरी येतांना आमदार मंगेश चव्हाण यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आल्याचे सोशल मीडियावर दिसत होते. याचवेळी त्यांनी मुंडन आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार आज रोजी त्यांनी व शेतकऱ्यांनी ऋषीपांथा येथे मुंडण करून तिघाडी सरकारचे तेरावे घातले, यावेळी तीन पायाच्या खुर्ची वर तिघाडी सरकारचा फोटो ठेवून सरकारचे श्राध्द घालण्यात आले.
निसर्गाचा लहरीपणा, महागडे मिळणारे बियाणे त्यातच शेतीमालाला मिळणारा मातीमोल भाव तसेच मागील वर्षापासून कोरोनाचा व सततच्या लॉकडाऊचा सामना करत, करत मेटाकुटीला आलेल्या कष्टकरी शेतकऱ्यांचा हातात पिके येण्याच्या कालावधीत विद्यूतपुरवठा खंडित केल्याने शेतकरी संकटात सापला असतांना त्याचे हातात येणारे सोन्यासारखे पिक हाताचे जाऊ नये म्हणून विद्यूतपुरवठा सुरु करण्यासाठी केले होते.
परंतु जामीन झाल्यानंतर त्यांनी पुन्हा श्राद्ध घालत सत्ताधारी सरकारचा निषेध नोंदवला आहे.