श्री.गो.से.हायस्कूल.पाचोरा येथे स्वराज्य प्रेरक राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०१/२०२१
आज दिनांक १२ जानेवारी २०२१ मंगळवार रोजी श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब व राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
त्यानिमित्ताने दोन्ही महान विभूतींना शाळे मार्फत आदरांजली अर्पण करण्यात आली. माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना माल्यार्पण, प्रतिमापूजन मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका सौ. प्रमिलाताई वाघ. पर्यवेक्षक आर. एल. पाटिल , एन.आर. पाटील, ए. बी. अहिरे व कार्यालय प्रमुख अजय सिनकर, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू- भगिनी यांनीही प्रतिमा पूजन केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.