गोंदेगाव येथे कोरोना लसीकरणाला यशस्वी सुरुवात.

गोंदेगाव ता.सोयगाव (प्रज्वल चव्हाण)
दिनांक०२/०४/२०२१
आज गोंदेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे CORONA VACCINE चे लसीकरणाला यशस्वी सुरुवात झाली असून पहिली लस माजी सैनिक श्री. नगराज पाटील. यांना देण्यात आली. तरी आपल्या गावातील व घरातील सदस्य वयवर्षे ४५ च्या पुढील सर्व जेष्ठ नागरिकांना लस देण्यात येईल.
या लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.घावटे, आरोग्य सेवक ए.एन.बोरसे ,आरोग्य सेविका व आशा सेविका यांनी अथक परिश्रम घेतले.
याप्रसंगी गोंदेगावचे सरपंच सौ. वनमाला निकम , ग्रामपंचायत सदस्य सदस्य गौरव बिन्द्वाल भाजपा सरचिटणीस समाधान सूर्यवंशी , पत्रकार जितेंद्र पाटील हे उपस्थित होते. तसेच सर्व गावकऱ्यांनी स्वतः शंभर टक्के लसीकरण करुन घेत आपल्या आरोग्याची तसेच गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन शासन, प्रशासन व आरोग्य विभागाला सहकार्य करावे अशी विनंती सरपंच, सदस्य, पोलीस पाटील व आरोग्य विभागातर्फे गोंदेगाव ग्रामस्थांना विनंती करण्यात आली असून सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळत घराबाहेर निघतांना तोंडाला मास्क लावा, हस्तांदोलन टाळा, विवाह सोहळे व इतर कार्यक्रम शासनाने ठरवून दिलेल्या अटी नुसार पार पाडून सुरक्षितता पाळावी जेणेकरून स्वतः व गाव सुरक्षित राहील असे सुचित करण्यात आले.