प.पू.आचार्य १०८ श्री कल्पवृक्षनंदीजी महाराज यांचे समाधी मरण.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०९/२०१
श्री. कल्पवृक्ष कलशाकार तिर्थक्षेत्र (फर्दापूर तांडा, ता.सोयगाव) प्रणेते प.पू.आचार्य श्री. १०८ कल्पवृक्षनंदीजी महाराज यांचे आज दिनांक २५ सप्टेंबर २०२१ शनिवार रोजी संध्याकाळी ७.३० वाजता महानिर्वाण झाले.
महाराजश्रींनी त्यांचे आद्यगुरु प.पू.आचार्य १०८ श्री. दर्शनसागरजी महाराज (सुसनेर, म.प्र.) यांचे आज सकाळी आशिर्वचन घेतले होते. सोबतच सर्व आचार्य व मुनिश्रींचे उपदेशही घेतले होते. त्यांची सल्लेखना सुरु असतांनाच त्याचे संध्याकाळी ७.३० वाजता महानिर्वाण झाले.
त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांनी अन्नत्याग (आहारत्याग) केला होता. पुर्वाश्रमीचे पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा, जि.जळगाव येथील रहिवासी असलेल्या महाराजश्रींनी आज इहलोक सोडून परलोकीचा मार्ग स्वीकारला आहे.
महाराजश्रींनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, बिहार आदी राज्यात समाज प्रबोधन केले होते. समाज बांधवांना व त्यांच्या अनुयायींना अंतिम दर्शन घेता यावे यासाठी महाराजश्रींचे पार्थिव कल्पवृक्ष क्षेत्रावर दुपारी १ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यांचेवर उद्या दि.२६ सप्टेंबर रोजी रोजी दुपारी १ वाजता कल्पवृक्ष कलशाकार क्षेत्रावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. समाज बांधवानी अंत्यदर्शनाचा लाभ घ्यावा.