पाचोरा तालुक्यात १३, १५ व १७ फेब्रुवारीस सरपंच उपसरपंचांच्या निवडणुका.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०२/२०२१
पाचोरा तालुक्यात १०० पैकी ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. यात १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. ९६ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी दि.१३ ते १७ फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहे.
दि. १३, १५ व १७ फेब्रुवारीस सरपंच उपसरपंचांच्या निवडणुकी यात प्रथम दि. १३ फेब्रुवारी रोजी वडगाव बु” प्र. पा. , गाळण बु”, वानेगाव, सावखेडा खु”, शिंदाड, पिंप्री बु. प्र. भ., सांगवी प्र. लो., डोंगरगाव, वरसाडे प्र. पा., परधाडे, बाळद बु”, कुऱ्हाड खु, वेरुळी बु”, कोल्हे, पहाण, सारोळा खु”, कळमसरा या गावांचा समावेश आहे. दि १५ फेब्रुवारी रोजी तारखेडा खु”, हनुमानवाडी, भोजे, वाडी, नाईकनगर, मोंढाळा, वरसाडे प्र. बो., अटलगव्हान, अंतुर्ली बु” प्र. पा., वेरुळी खु”, सातगाव डोंगरी, बांबरुड राणीचे, सारोळा बु, डांभुर्णी, लोहारा व आखतवाडे या गावात निवड होणार आहे. तर दि. १७ फेब्रुवारी रोजी वडगाव खु प्र पा, पिंप्री बु” प्र. पा., निंभोरी, चिंचपुरे, वडगाव कडे, सारवे बु” प्र. भ., साजगाव, वाघूलखेडे, आसनखेडे बु”, मोहाडी, खडकदेवळा बु”, अंतुर्ली खु”. प्र. लो., खेडगाव (नंदीचे), सावखेडा बु”, बिल्दी, पिंप्री खु”. प्र. पा., पिंपळगाव (हरे.), शहापुरा व नगरदेवळा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. यासाठी सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे व दुपारी २ वाजता विशेष सभेचे कामकाज सुरू करण्यात येणार असल्याचे तहसिलदार कैलास चावडे यांनी कळविले आहे.