सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›जिल्हा पोलीस दलास आज मिळणार वाहनांचा ताफा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण.

जिल्हा पोलीस दलास आज मिळणार वाहनांचा ताफा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण.

By Satyajeet News
April 2, 2021
957
0
Share:
Post Views: 44
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०४/२०२१

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक २ एप्रिल रोजी सुपूर्द करण्यात येणार आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी संख्येच्या तुलनेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या ही खूप कमी आहे. यातच सध्याची अनेक वाहने ही जुनी असल्याने त्यांची वारंवार करण्यात येणारी डागडुजी ही डोकेदुखी ठरत असते. याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस दलासाठी नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहनांची आवश्यकता असल्याची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. याला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार पालकमंत्र्यांनी तत्काळ होकार दिला होता. मध्यंतरी कोविडच्या आपत्तीमुळे अन्य कामांच्या खर्चावर मर्यादा होती. ही मर्यादा दूर झाल्यानंतर ना. गुलाबराव पाटील यांनी वाहन खरेदीला मंजुरी मिळवून दिली होती.

जिल्हा नियोजन समितीने दिनांक २४ जानेवारी २०२१ रोजी २९ महेंद्रा बोलेरो (बीएस-४) आणि ७० होंडा शाईन दुचाकींना खरेदीची मंजुरी दिली होती. यासाठी २ कोटी, ३० लक्ष, ९६ हजार, ४७८ रूपयांची तरतूद करण्यात आली होती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ही वाहने २ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता सुपूर्द करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पोलीस मुख्यालयात आयोजीत करण्यात आलेला आहे. पोलीस दलात वाहनांचा नवीन ताफा दाखल होणार असल्यामुळे विविध गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

*महिला रूग्णालयाची पाहणी*

दरम्यान, जिल्ह्यातील कोविड रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मोहाडी रोडवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने उभारण्यात आलेल्या महिला महाविद्यालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येणार आहे. या संदर्भात सुरू असणार्‍या कामांचा आढावा घेण्यासाठी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री ना. पाटील हे या हॉस्पीटलची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा राज्यातील पहिला मोठा प्रकल्प कोरोनाग्रस्तांसाठी उपयोगात येणार आहे. या पाहणी प्रसंगी पालकमंत्र्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आणि सार्वजनीक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता श्रेणी-१ सुभाष राऊत हे उपस्थित राहणार आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा तालुक्यातील वकील गौतम बाविस्कर यांचं निधन ...

Next Article

रेमेडिसिव्हर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या तुटवड्या बाब आमदार ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    गावठी डुकरांचा उच्छाद, शेतातील हरभरा व दादरचे पिक फस्त शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान.

    February 3, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    ग्रामपंचायत खड्डा बुजवत नसल्याने, मुलाच्या वाढदिवसानिमित्त गप्पी मासे सोडणार.

    May 8, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    डॉ. प्रशांत पाटील. यांनी केल्या मार्गदर्शक सूचना.

    May 6, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    यिनच्या राजकीय संघटन मंत्रीपदी भूपेश सोमवंशी यांची निवड.

    August 12, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा शिंपी समाजाचे तालुका युवक अध्यक्षपदी शैलेश शिंपी.

    July 21, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा शहरात व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्टला सुरवात. पहिल्याच दिवशी २२९ पैकी १८ पॉझिटिव्ह.

    March 14, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा तालुक्याची आमसभा घ्यावी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विकास पाटील यांचे आवाहन.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा, भडगाव विधानसभेचे उमेदवार प्रताप पाटील यांच्या शिक्षणसंस्थेतील बोगस शिक्षक भरतीची फेर चौकशी व्हावी, विजय पाटील.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा शहर मराठा महासंघ नूतन कार्यकारिणी जाहीर, पाचोरा मराठा महासंघ शहराध्यक्षपदी प्रवीण पाटील

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज