जेष्ठ शिक्षक बी. एन. पाटील. (पत्रकार) यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड व भारत-बांगलादेश प्रकल्पात सहभागी झाल्याबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला सत्कार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे भातखंडे माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.बी.एन.पाटील. सर पत्रकार यांनी भारत-बांगलादेश टेली कोलँबोरेशन प्रोजेक्ट मध्ये सहभाग घेतला. तसेच अलीकडेच १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या तर्फे त्यांना राज्यस्तरीय मानाचा “ग्रीन वर्ल्ड” सन्मानाचा पुरस्कार घोषित झाला यांची दखल भडगाव, पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी घेऊन आज दिनांक २० ऑगस्ट २०२१ वार शुक्रवार रोजी त्यांच्या निवासस्थानातील कार्यालयात त्यांचा शाल,श्रीफळ व बुके देऊन भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देत यथोचित सत्कार केला.
या प्रसंगी आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांचे खंदे समर्थक व कट्टर शिवसैनिक गजू दादा पाटील, शाळेतील शिक्षक एस बी भोसले सर, कलाशिक्षक श्री संदीप पाटील सर ,केंद्रप्रमुख प्रवीण आत्माराम पाटील सर, अखिल पाचोरा प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष प्रवीण रमेश पाटील, कवी लेखक चारोळीकार सुरेश कदम सर, विनोद महाजन सर ,अनिल पाटील हे उपस्थित होते.