गव्हले येथील एकलव्यांचे गाव विकासासाठी आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांना साकडे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०९/२०२३
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथुन जवळच व जळगाव जिल्ह्याच्या सरहद्दीवर व मराठवाड्याच्या जवळच डोंगर काठावर बसलेले गव्हले हे छोटेसे गाव आहे. या गावात तडवी बांधवांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे या गावात कोणत्याही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नसल्याने गावातील तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गव्हले या छोट्याशा गावातील तडवी बांधवांची वस्ती अस्ती असून या तडवी बांधवांची मुले रोजंदारी व काबाडकष्ट करुन शिक्षण घेत आहेत. या गावातुन तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी वेळेवर बसेस उपलब्ध नसल्याने ही मुले शिक्षण घेण्यासाठी कधी पायपीट करुन तर कधी मिळेल त्या साधनांचा वापर करुन उन, वारा, पावसात शिक्षण घेण्यासाठी धडपडत करत आहेत. शिक्षण घेऊन काही मुले पोलीस व सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मात्र गावात वाचनालय व व्यायामशाळा नसल्याने या गोरगरीब कष्टकरी कुटुंबातील मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून गव्हले गावात लवकरात, लवकर व्यायामशाळा, वाचनालयाची व्यवस्था करुन देण्यात यावी, समाजमंदिर किंवा मंगल कार्यालय बांधुन मिळावे, तडवी बांधवांसाठी असलेल्या घरकुल योजना, मोफत धान्य योजन व विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी गव्हले येथील तरुणांनी थेट पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांची भेट घेऊन गव्हले गावातील समस्यांचा पाढा वाचला व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हाला कोणत्याही सुविधा मिळालेल्या नाहीत व मिळतही नाहीत अशी तक्रार केली आहे.