लोहारा येथे हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०१/२०२१
लोहारा तालुका पाचोरा येथील ग्रामपंचायत मध्ये वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त लोहारा वासियांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी म्हटले की महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईमध्ये मराठी भाषा मराठी माणसाचे अस्तित्व टिकवून ठेवले याचे संपूर्ण श्रेय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांना जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देश प्रेम तरुणांसाठी प्रेरणादायी आहे असे सांगितले. यावेळी सुर्वे वाचनालयाचे अध्यक्ष बापू युवराज पाटील, रवींद्र पाटील, तुषार कासार, दिनकर गीते, सुभाष देशमुख, विशाल गीते, पंकज माळी, संतोष कोळी, हेमंत गुरव, महेंद्र घोंगडे, गजानन भोसानडे, संतोष भिल, नरेंद्र पालीवाल, भरत पाटील, नंदु चव्हाण, संभाजी लिंगायत, श्रावण पाटील, राहुल चौथे, वैभव गिते, मीनाताई, रामराज्य फाउंडेशन सदस्य, माणुसकी ग्रुप सदस्य,इतर गावकरी मंडळी उपस्थित होते..