राष्ट्रीय स्तरीय आभासी सहा दिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०६/२०२१
शेंदूर्णी येथील अप्पासाहेब र.भा.गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक,शारीरिक शिक्षण व खेळ विभाग व जोशाबा युवा मंडळ,नवापूर जि. नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसीय आभासी राष्ट्रीय स्तरीय प्रशिक्षण शिबिराचा समोरोप आज करण्यात आला.
या शिबिराची आभासी पद्धतीने सुरवात दिनांक १६ जून पासून करण्यात आली.हे योग प्रशिक्षण सहा दिवसांपासून रोज सकाळी ६ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आले होते.
या उपक्रमाचे उदघाटन दिनांक १६ जून बुधवार रोजी करण्यात येऊन आज समारोप करण्यात आला.नियमित पद्धतीने आज सकाळचे सत्र घेऊन समारोप करण्यात आला.या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी जोशाबा सरकार युवा मंडळ नवापूर संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.नितीनकुमार माळी व सचिव सौ.निलीमा माळी यांचे योग शिक्षक म्हणून मार्गदर्शन लाभले.त्यांनी सहा दिवसांचा योग व प्राणायाम विशेष अभ्यासक्रम तयार करून त्याप्रमाणे साधक स्पर्धकांची तयारी करून घेतली. आपल्या मनोगतात स्पर्धकांनी योग शिक्षकांचे व आयोजकांचे आभार मानले व या योग प्रशिक्षणाचा खूप लाभ झाल्याचे सांगितले.या शिबिराच्या यशस्वी आयोजनाचे संस्थेचे अध्यक्ष मा.संजयदादा गरुड, सचिव मा.सतीश चंद्रजी काशीद व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील सरांनी अभिनंदन केले.
या प्रशिक्षण शिबिरासाठी भारतातून ओडिशा, गुजरात, राजस्थान, हरियाणा येथून स्पर्धक जॉईन झालेले होते.या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील व क्रीडा संचालक प्रा.डॉ.महेश पाटील यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली.
महाराष्ट्रातून नांदेड, नागपूर, पुणे, धुळे, नंदुरबार, सातारा, मुंबई, लातूर, बीड, औरंगाबाद, परभणी, बुलढाणा,जळगाव येथून स्पर्धक सहभागी झाले होते. आयोजित प्रशिक्षण शिबिराचे youtube live streaming करण्यात आले.या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचा एकूण ८२९ स्पर्धकांनी गेल्या सहा दिवसात लाभ घेतला.