राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांची नगरदेवळा येथे धावती भेट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०३/२०२३
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. जयवंतराव पाटील हे सद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान २८ मार्च २०२३ मंगळवार रोजी चाळीसगाव जात असतांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हा बँकेचे माजी चेअरमन मा. श्री. गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष मा. श्री. रविंद्र भैय्या पाटील, बि. एस. रोकडे, पवार माध्यमिक विद्यालयाचे मानद सरचिटणीस मा. श्री. शिवनारायण जाधव, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मा. श्री. मुन्ना काका परदेशी, संचालक मा. श्री. सुनील तावडे, रज्जाक शेख यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत नगरदेवळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती महिला जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे यांच्या निवासस्थानी अचानकपणे सदिच्छा भेट दिली. या वेळी अभिलाषा रोकडे यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे जंगी स्वागत केले. याप्रसंगी नगरदेवळा गावासह पंचक्रोशीतील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.