जिल्ह्यातील प्रस्तावित अपूर्ण प्रकल्प लवकरच पूर्ण करणार माजी. मंत्री. एकनाथराव खडसे
जिल्ह्यातील प्रस्तावित अपूर्ण प्रकल्प लवकरच पूर्ण करणार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची ग्वाही
दिलीप जैन. (पाचोरा)
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत व खडसे हे शेतकरी हिताचे निर्णय घेतील अशी आशा होती आता शेतकऱ्यांचा अंदाज खरा ठरला असून मुक्ताई साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी त्यांनी शेतकरी हितासाठी कामास सुरवात केली असे दिसून येते
कारण मुक्ताई साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचे शुभारंभ प्रसगी त्यांनी सांगितले की गेले तीस वर्षांपासून मी आमदार आहे. मंत्री राहून गेलो. त्यामुळे आता पदाची अपेक्षा नसून मी मतदारसंघात, जिल्हयात सुरू केलेले, आणि प्रस्तावित केलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पक्षांतर केले आहे. ते पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सामूहिक सहकार्याची गरज आहे. असे एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे मुक्ताई साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले. कारखान्याने यावर्षी उसाला २२३४ रु भाव देण्याचे निश्चित केले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
संत मुक्ताई शुगर अँड एनर्जी मुक्ताईनगर या साखर कारखान्याचा सातवा बॉयलर अग्नी प्रदिपन व गळीत हंगामचा शुभारंभ कारखाना कार्यस्थळावर पार पडला. शुभारंभ माजी मंत्री एकनाथराव खडसे व दूध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्या शुभहस्ते तर बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे खेवलकर हस्ते झाला.
संत मुक्ताई शुगर अँड एनर्जी लि.चेअरमन शिवाजीराव भगवानराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष रविंद्र पाटील, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, माजी आ. कैलास पाटी , नगराध्यक्षा नजमाताई तडवी ,विनोद तराळ, आणि सर्व लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले, मुक्ताई साखर कारखाना हा गेल्या सहा वर्षांपासून नाथाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत सुरू असून नेहमी एफ आर पी पेक्षा जास्त भाव देऊन तत्काळ उसाचे पेमेंट अदा करतो. असेही ते म्हणाले. त्याबद्दल चेअरमन शिवाजी जाधव, व्हा चेअरमन रोहिणी खडसे यांचे अभिनंदन करतो. नाथाभाऊ यांनी पक्षांतर केल्यामुळे भाजप प्रत्येक तालुक्यात बैठका घेत आहेत परंतु मोजकेच कार्यकर्ते भाजप मध्ये राहिले असल्या कारणाने उपस्थितांपेक्षा स्टेजचेच फोटो टाकले जात आहेत. अशी टीका देखील त्यांनी केली.
यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले, मुक्ताई साखर कारखाना हा सन २०१४-१५ पासुन अविरत चालु असुन साखर उत्पादना बरोबर सन २०१६-१७ मध्ये कारखान्याचा १२ मेगावॅट क्षमतेचा ऊसाच्या चिपाडापासुन सहविजनिर्मीती प्रकल्प कार्यान्वीत झाला आहे. सदर प्रकल्पातुन तयार होणारी विजेमधुन कारखान्याची गरज भागवुन उर्वरीत विज हि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ यांना निर्यात होत असुन त्याद्वारे शेतकर्याच्या ऊसास योग्य दर देण्यास मदत होते.
मागील गळीत हंगाम २०१९-२० मध्ये कारखान्याने एकुण ऊस गळीत १,४३,५९२ मे.टन केले असुन त्यामधुन एकुण १,५३,३५० क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले. तसेच सरासरी साखर उतारा हा १०.६८ टक्के मिळाला व कारखान्याच्या सहविज निर्मीती प्रकल्पातुन एकुण १,०४,५३,७०० युनिट विज निर्मीती होवून त्यापैकी कारखान्याचा विज वापर ४२,००,७०५ युनिट झाला असुन उर्वरीत ६३,५६,७४५ युनिट विज हि महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण मंडळास निर्यात केली आहे. तसेच मागील वर्षी (२०१९-२०) गळीतास आलेल्या ऊसास एकुण एकरकमी रु.२०००/- प्रती मे.टन दर त्वरीत अदा केला असुन कोणत्याही शेतकर्याचे ऊसाची रक्कम देणे बाकी नाही. या गळीत हंगाम २०२०-२१ साठी कारखान्याने चार लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असुन त्याकामी कारखान्यामार्फत ऊस तोडणी व वाहतुक यंत्रणा तसेच यांत्रीकी पद्घतीने ऊस तोड करण्यासाठी ५ ते ७ हार्वेस्टर हि कारखाना स्थळावर उपलब्ध झाले आहेत. कारखान्याकडुन प्रोग्रामनुसार ऊस तोडणी व वाहतुकीचे नियोजन हि पुर्ण झाले असुन यावर्षी कारखाना कार्यक्षेत्र तसेच गेटकेन भागातील चोपडा, जाफ्राबाद, मेहेकर, नेपानगर (मध्यप्रदेश) इत्यादी ठिकाणावरुन ऊस तोडणी करुन कारखान्यास गळीतास आणण्याचेही नियोजन पुर्ण झाले असुन कारखाना गळीत पुर्ण क्षमतेने करणेचे दृष्टीने सर्व तयारी झाली आहे. तसेच गळीत हंगाम शुभारंभानंतर लगेच कारखाना गाळपास प्रत्यक्ष सुरवात होईल, असेही खडसे म्हणाले.
तसेच कारखाना व्यवस्थापनाने नविन ऊस लागवडीकरीता शेतकी विभागामार्फत यावर्षी मागील वर्षाप्रमाणे कारखान्याकडुन एकरी १.५ मे.टन बेणे वसुलप्राप्त पद्धतिने उपलब्ध करुन देण्यात येत असुन सदर योजनेचा कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी यांचा पुरेपुर लाभ घ्यावा असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवरे, रवी भोसले, पंकज पाटील यांनी परिश्रम घेतले.
यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जि.प.सदस्य कैलास सरोदे,निलेश पाटील, वैशाली तायडे,वनिता गवळे,बोदवड पं.स.सभापती किशोर गायकवाड, पं.स.सदस्य राजेंद्र सावळे, विनोद पाटील, प्रदीप साळुंखे, गणेश पाटील, ईश्वर राहणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, साहेबराव सिंगतकर, विशाल खोले महाराज, शाहिद खान, किशोर चौधरी, वसंत पाटील, कल्याण पाटील, देवेंद्र खेवलकर, आबा माळी, दिपक झाबड,प्रमोद धामोळे, रामदास पाटील, मधुकर राणे, कैलास चौधरी, विनोद कोळी, सईद बागवान, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, हाजी मुन्ना तेली, विलास धायडे, दशरथ कांडेलकर, शिवाजी पाटील, राम पाटील, राजू माळी, विश्वनाथ चौधरी, बि.सी. महाजन, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे आदी उपस्थित होते