पाचोरा शहरात मोकाट गुरांचा उपद्रव, वाहनधारक त्रस्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/११/२०२१
पाचोरा शहरात सिंधी कॉलनी परिसर तसेच जारगाव चौफूली व शहरातील मुख्य भागात, मोकाट गुरांचा उपद्रव वाढला असून मोकाट गुरे कळपाने राहत असल्याने भर रस्त्यावर ठिय्या मांडून बसतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून वाहन धारकांना आपले वाहन कसे न्यावे याबाबत अडचण निर्माण होत आहे.
तसेच सिंधी कॉलनी परिसरात जामनेर पाचोरा रस्त्याचे लगतच येथील रहिवासी केरकचरा टाकतात या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असलेले शिळे अन्न तसेच इतर खाद्यपदार्थ खाण्यासाठी मोकाट गुरे, कुत्रे, व डुकरे या उकिरड्यावर येत असतात. व वाहन आल्यावर हे जनावरे अचानकपणे रस्त्यावर पळत येत असल्याने अपघात होत आहेत.
तरी या मोकाट गुरांचा, डुकरांचा व कुत्र्यांचा पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी पाचोरा रहिवासी व अनेक वाहनधारकांकडून केली जात आहे.