कायमस्वरूपी दारूबंदी करण्यासाठी कुऱ्हाड येथील महिला आक्रमक.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~१०/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुर्हाड खुर्द येथील गावठी दारुची निर्मिती व विक्री तसेच देशी दारुच्या अवैध विक्री सह अनेक अवैध धंदे तालुक्यात नव्हे तर जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. यामागील कारणही तसेच आहे. कुऱ्हाड येथील अवैध धंदे हे आसपासच्या दहा खेड्यांची डोकेदुखी ठरत असून अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी जवळपास मागील दोन वर्षापासून असंख्य महिला, सूज्ञ नागरिक सतत अर्जफाटे करत असून मागे महिलांनी आंदोलन छेडले होते. तरीही कुऱ्हाड गावातील अवैध धंदे बंद होत नसून दिवसेंदिवस अवैध धंदे करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत.
https://youtu.be/-5TMUBZADBQ
या अवैध धंद्यामुळे मुळे कुऱ्हाड गावासह आसपासच्या पाच ते सात गावांची शांतता व कायदासुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. तसेच गावात विकल्या जाणाऱ्या देशी, विदेशी, गावठी दारू मुळे अनेक तरुण मुले या व्यसनाच्या आहारी जाऊन मृत्युला कवटाळत आहेत. त्यात काहींचे जीवन उद्ध्वस्त होऊन संसार उघड्यावर आले आहेत. व ही मालिका सुरुच असून अनेक संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होण्यासाठी कुऱ्हाड येथील महिला व सुज्ञ नागरिकांनी सतत प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र हे अवैध धंदे बंद होण्याचे नाव घेत नसून तसेच या अवैधधंद्याचे विरोधात आवाज उठवणारांना दमदाटी तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षडयंत्र रचले जाते.
(याबाबत अवैध धंद्याचे विरोधात ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी नुसार सत्यजीत न्यूज कडून वारंवार आवाज उठवण्यात आला. परंतु दोन दिवसापूर्वीच अवैध धंदे करणाऱ्यांच्या पाठिशी असलेल्या एका हितचिंतकांने सत्यजीत न्यूजला भ्रमणध्वनीवर अप्रत्यक्षपणे धमकावण्याचा प्रयत्न करुन तुम्ही अश्या बातम्या वारंवार लाऊ नका तुम्ही तुमच्या कामानिमित्त बाहेरगावी फिरत असतात कधीकधी कुऱ्हाड येथेही येतात म्हणून हे अवैध धंदे करणारे काय करतील याचा नेम नाही असा असा धमकी वजा सुचक इशारा करत दडपण आणण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला आहे.)
एवढे करुनही कुऱ्हाड खुर्द गावातील सर्वप्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कुऱ्हाड गावातील महिलांतर्फे दिनांक ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र दारूबंदी युवा मोर्चाच्या प्रमुख वक्त्या धुळे येथील गीतांजलीताई कोळी यांना कुऱ्हाड गावात आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी कुऱ्हाड येथे येऊन येथील ग्रामपंचायत कार्यालयातील भाडेतत्त्वावर दिलेल्या हॉलमध्ये महिलांची बैठक घेतली. या बैठकीत अवैध धंद्या सोबत दारुबंदीवर चर्चा झाली. या बैठकीत त्रस्त महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत आमच्या गावात कायमस्वरूपी दारु व अवैध धंदे बंद करण्यासाठी गीतांजलीताईंना साकडे घातले.
याची दखल घेत कुऱ्हाड गावात १६ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेतील अवैध धंदे व दारूबंदीसाठी करण्यात आलेला ठराव सोबत घेत प्रथम पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदीसाठी युवा मोर्चाच्या अध्यक्षा गीतांजलीताई यांच्या उपस्थित आपला मोर्चा नेण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. या बैठकीस महाराष्ट्र दारू बंदी युवा मोर्चाच्या महिला अध्यक्षा गीतांजली कोळी, सरपंच संगीता कैलास भगत, मा.ग्रामपंचायत सदस्य प्रभावती शिंपी, व गावातील असंख्य महिला उपस्थितीत होत्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/१२/२०२१
कुऱ्हाड येथील अवैध धंदे बंद करण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे धरल तर चावत, सोडल तर पळत.
(याबाबत अवैध धंद्याचे विरोधात ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी नुसार सत्यजीत न्यूज कडून वारंवार आवाज उठवण्यात आला. परंतु दोन दिवसापूर्वीच अवैध धंदे करणाऱ्यांच्या पाठिशी असलेल्या एका हितचिंतकांने सत्यजीत न्यूजला भ्रमणध्वनीवर अप्रत्यक्षपणे धमकावण्याचा प्रयत्न करुन तुम्ही अश्या बातम्या वारंवार लाऊ नका तुम्ही तुमच्या कामानिमित्त बाहेरगावी फिरत असतात कधीकधी कुऱ्हाड येथेही येतात म्हणून हे अवैध धंदे करणारे काय करतील याचा नेम नाही असा असा धमकी वजा सुचक इशारा करत दडपण आणण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला आहे.)