राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री मा.ना.श्रीमती यशोमती ठाकूर आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/११/२०२)
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री मा.ना.श्रीमती यशोमती ठाकूर आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांचे शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे निळीशाल व फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील तसेच शहरातील झोपडपट्टी भागामध्ये अंगणवाड्यांमध्ये वाढ करावी व निधी शासनाने पुरेपूर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली कोरोनाच्या महामारी मुळे अंगणवाड्या मधील येणारा निधी शासनाने कमी न करता ज्यादा द्यावा जेणेकरून अंगणवाड्या मधील मुला-मुलींना शालेय पोषण आहारच्या माध्यमातून लाभ मिळेल असे निवेदन यावेळी महानगराध्यक्षअनिल अडकमोल महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे यांनी दिले यावेळी मंत्रीमहोदयांनी निश्चितच अंगणवाड्या मध्ये वाढ करून आर्थिक निधी सुद्धा पूर्ण दिला जाईल असे आश्वासन यावेळी दिले.