कुसुंब्याहुन प्रस्थान केलेले जैन मुनिश्री कूंथलगीरि क्षेत्रात दाखल पद्मावती युवा मंच वापसी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१२/२०२१
साऱ्या खान्देशचे लक्ष वेधून घेणारे कुसुंबा येथील ऐतिहासिक जैन चातूर्मास समापना नंतर प.पू. सूदेह सागरजी महाराज येथून २३ नोव्हेंबर रोजी मांगीतुंगीजी सिद्धक्षेत्र मार्गे नांदगाव शिवुर, वेरूळ, पाचोड, बीड, मार्गे प्रस्थान केले होते आणि संघ दिनांक १९ डिसेंबर रविवार रोजी कूंथलगिरि क्षेत्र येथे दाखल झाले. अशी माहिती कुसुंबा जैन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त व खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धी प्रमुख सतीश वसंती लाल जैन ( कुसुंबा ) व महेंद्र हिरालाल जैन यांनी दिली.
त्यांच्यासोबत पार्श्वनाथ सेवा समितीचे आणि पद्मावती युवा मंचाचे पदाधिकारी श्रुतकुमार सतिष जैन, मयुर रिखब जैन, स्वप्नील महेंद्र जैन, पारस नवनीत जैन, सुरेंद्र रतनलाल जैन, गौरव उल्हास जैन, संयम राजेंद्र जैन, राजेंद्र नवनीतलाल जैन, सौ त्रिशला पंकज जैन, सौ प्रतिभा राजेंद्र जैन, लता जैन लासुर्णेकर आदी संघचालक होते. कुसुंबा ते कूंथलगिरि या ५१० किमी पदयात्रेत पूज्य श्री ज्या ज्या स्थळी पोचले त्या त्या गावातील जैन जैनतरांनी स्वागत करुन आपले भावना प्रकट केली.
सध्या हुडहुडीच्या दिनात ही मुनीश्रींच्या दिनचर्येत कोणताही फरक पडत नाही. थंडीच्या दिनात प्रात:कालीन घराबाहेर पडण्याचे धाडस कोणीच करत नाही. मग अनवाणी चालत जाणे तर दूरच राहिली मात्र जैन मुनी याला अपवाद आहेत. त्यांच्या सहनशीलतेला आणि त्यागमयी संयम जीवनाला सर्वच जण नमन त्रिवार करतात. धन्य धन्य ते जीवन धन्य धन्य ती तपसाधना असे उद् गार आपोआपच निघतात. मुनीश्रींना पाहून लोकांना प्रचंड आश्चर्य वाटते एवढ्या थंडीत व तेही प्रात:कालीन दिगंबर अवस्थेत ते कसे चालत असतील असा प्रश्न पडून सर्वांच्याच माना श्रद्धेने झुकतात.