कजगाव विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते भव्य शुभारंभ सोहळा संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२१
कजगाव परिसरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये गोरगरिब रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेला ८ मार्च २०१९ पासून शुभारंभ झाला आहे. जिल्हयात गेल्या पाचोरा भडगाव चाळीसगाव तालुक्यातील बऱ्याच वर्षांनंतर प्रथमच पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयास महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेस शासनाकडुन मान्यता मिळाली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात व पाचोरा सारख्या तालुक्याच्या ठिकाणी १२० खाटांच्या आरोग्य सुविधांनी सज्ज असलेल्या गोर-गरिब रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या योजनेस सुरूवात झाली आहे, आता चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील मध्यवती ठिकाणी कजगाव येथे आज सकाळी २४ जानेवारी रोजी १०.३० वा आ रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.भुषण मगर डॉ.सागर गरुड, डॉ.प्रिती मगर, डॉ.अंबिका घोष डॉ संदीप इंगळे डॉ प्रवीण देशमुख डॉ अनुजा देशमुख विनोद परदेशी उपस्थिती होते