कळमसरा येथील दत्तात्रय तावडे’ पर्यावरण मित्र’ पुरस्काराने सन्मानित.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील गंगा नर्सरीचे संचालक मा.श्री. दत्तात्रय माहूजी तावडे यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी चेअरमन मा.श्री. बळीराम जाधव, मा.श्री. रमेश पाटील उर्फ बाळू सावकार यांच्या हस्ते कळमसरा येथील मराठी मुलांच्या शाळेत करण्यात आले.
संस्थेचे संचालक मा.श्री. योगेश वाघ यांनी तावडे यांच्या सामाजिक व पर्यावरण विषयक कार्याची माहिती दिली. तावडे यांनी गावातील स्मशानभूमी व गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. त्यांनी मुक्या प्राण्यांची तहान भागावी, यासाठी स्वत:चे गाव, नजिकचे गाव, शेतशिवार, जंगल क्षेत्रात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी हाळ उभारले आहेत. त्यांचा वडाच्या झाडाचे जास्तीत जास्त प्रमाणात रोपण व संवर्धन चळवळीवर भर आहे. त्यांनी ग्रामीण भागातील दुर्मिळ होत असलेल्या वस्तूंचे संग्रहालय स्वतः च्या घरात साकारले आहे. या उल्लेखनीय कार्याचे कौतुक बळीराम जाधव व रमेश पाटील यांनी केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद वाघ, अतुल वाघ आदी उपस्थित होते.